शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

रासेगावजवळ अपघातात दोनठार

By admin | Updated: June 4, 2016 23:25 IST

रासेगावजवळ अपघातात दोनठार

नाशिक : पेठकडून येणाऱ्या नाशिक ग्रामीण वाहतूक शाखेचे पोलिसांच्या गस्त पथकाची जीप रासेगावकडे जाणाऱ्या दोघा दुचाकींवर येऊन आदळल्याने अपघात घडला. या अपघातात सातपूर येथील एक दुचाकीस्वार जागीच ठार, तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. पेठरोड वरून महामार्ग पोलिसांचे गस्त पथकाची टाटा सुमो (एम.एच.१५ अ‍ेअ‍े५२२७) भरधाव येत असताना धोकादायक वळणावरच चालकाचे नियंत्रण सुटल्याने पोलीस वाहन रस्त्यावर उलटल्याने रासेगावकडे जाणाऱ्या दोन दुचाकींना धडक बसली.या धडकेत दुचाकी (एम.एच.१५ अ‍ेएन ७६४६)चा चक्काचूर झाला या दुचाकीवरील अशोकनगर, सातपूर भागातील रहिवासी गणेश शिवराम पगारे (४२) यांचा जागीच मृत्यू झाला, तर याच दुचाकीवरील काशीनाथ पेंटाप्पा जय (४०, रा. प्रबुद्धनगर) हे गंभीर जखमी झाले. तसेच दुसऱ्या दुचाकीवरही (एम.एच.१५ सीजी २५००) पोलिसांची सुमो येऊन आदळली. सुदैवाने या दुचाकीवरील दोघे बचावले; मात्र वैभव शंकर धोंडगे (२०, रा.रासेगाव) याचा दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर श्याम भगवान ढगे (२३) याच्या पायाला व डोक्याला जबर मार लागला आहे. यापैकी दोघा रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले असून, एकावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. या अपघातात दोन पोलीस कर्मचारी किरकोळ स्वरूपात जखमी झाल्याचे समजते.