शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

आणखी दोन दिवस उष्माघात

By admin | Updated: March 28, 2017 00:41 IST

नाशिक : हवामान खात्याने येत्या ४८ तासांत मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केल्याने आपत्ती व्यवस्थापन विभागाने विभागातील नागरिकांना दक्षतेच्या सूचना दिल्या

नाशिक : हवामान खात्याने येत्या ४८ तासांत मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केल्याने राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने नाशिकसह विभागातील नागरिकांना दक्षतेच्या सूचना दिल्या असून, त्यासाठी घ्यावयाची काळजीबाबत मार्गदर्शनही केले आहे.  गेल्या दोन दिवसांपासून नाशिकसह मध्य महाराष्ट्रात उष्मालाट आली असून, तपमानाने चाळीशी पार केल्याने त्याचा जनजीवनावर परिणाम झाला आहे. सकाळी १० वाजेपासूनच उन्हाचा तडाखा बसू लागल्याने घराबाहेर पडणेही मुश्किल झाले आहे. अंगाची लाहीलाही करणाऱ्या उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिक हरतऱ्हेचे प्रयत्न करू लागले आहेत.  येत्या ४८ तासांत उष्णतेची लाट अशीच कायम राहील किंबहुना त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. हवामान खात्याचा अंदाज लक्षात घेता राज्य आपत्ती व्यवस्थापन  विभागाने दक्षतेच्या सूचना दिल्या आहेत. वाढत्या उष्मेमुळे शारीरिक ताण पडून मृत्यू होण्याची शक्यता अधिक असल्याचेही आपत्ती व्यवस्थापन विभागाने म्हटले आहे. काय करावेतहान लागली नसली तरी जास्तीत जास्त पाणी प्यावेहलकी व पातळ सच्छिद्र सुती कपडे वापरावीतबाहेर जाताना गॉगल्स, छत्री, टोपी, बूट व चपलांचा वापर करावाप्रवास करताना पाण्याची बाटली सोबत ठेवावीशरीरातील पाणी कमी झाल्यास लस्सी, लिंबू पाणी, ताक याचा वापर करावाअशक्तपणा, स्थुलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे असल्यास तत्काळ डॉक्टरांकडे जावेघरे थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करण्यात यावा. रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्यातजागोजागी पाणपोईची सुविधा करण्यात यावी.काय करू नयेलहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये.दुपारी बारा ते साडेतीन या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळा.गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावेबाहेर तपमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत, दुपारी बारा ते साडेतीन या वेळेत बाहेर काम करणे टाळावेउन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळावे.मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराच्या खिडक्या, दरवाजे उघडे ठेवावीत.