नाशिकरोड : नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात पुन्हा दोन मोबाइल आढळून आले असून, याप्रकरणी दोघा कैद्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात गेल्या शनिवारी दुपारी कारागृह रक्षक अब्दुल गणी शेख हे गस्त घालीत असताना मंडल क्रमांक ७ यार्ड क्र. २ मध्ये बंदिस्त असलेला कैदी लक्ष्मण धनेश चव्हाण हा संशयीतरीत्या हालचाल करीत असल्याचे शेख यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी त्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. मात्र तोपर्यंत चव्हाण याने प्लास्टिकच्या पिशवीत काहीतरी वस्तू गुंडाळून त्याच्या यार्डातून बाहेर फेकल्या. तर सहकारी कैदी अनिल रामशकल शर्मा याने ते यार्डाजवळील शौचालयाजवळ एका ठिकाणी लपवून ठेवले होते. कारागृह रक्षक गस्त घालत असताना सोमवारी दुपारी शौचालयाजवळ प्लास्टिकच्या पिशवीत लपवून ठेवलेले दोन मोबाइल आढळून आले. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात कैदी लक्ष्मण चव्हाण, अनिल शर्मा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
कारागृहात सापडले दोन मोबाइल
By admin | Updated: November 23, 2015 23:56 IST