शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

कोनांबे येथे तळ्यात बुडून दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 00:11 IST

सिन्नर : महामार्गासाठी मुरूम व दगड काढल्यानंतर तयार झालेल्या तळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोघा महाविद्यालयीन युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी ४.१५ वाजेच्या दरम्यान तालुक्यातील कोनांबे परिसरात घडली.

ठळक मुद्देमहार्गासाठी लागणाऱ्या खडीचे उत्पादनदेखील याच ठिकाणी करण्यात येते.

सिन्नर : महामार्गासाठी मुरूम व दगड काढल्यानंतर तयार झालेल्या तळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोघा महाविद्यालयीन युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी ४.१५ वाजेच्या दरम्यान तालुक्यातील कोनांबे परिसरात घडली.कोनांबे शिवारात समृद्धी महामार्गाचे काम सुरू असून, महार्गासाठी लागणाऱ्या खडीचे उत्पादनदेखील याच ठिकाणी करण्यात येते. त्यासाठी लागणारा दगड जमिनीतून काढल्याने तेथे तळे तयार झाले आहे. मध्यंतरी पडलेल्या पावसाने हे तळे पूर्ण भरले असून सोनांबे येथील विजय मधुकर वारु ंगसे (१९), गणेश भास्कर वारुंगसे (१९) हे सोनांबे येथील युवक गुरुवारी दुपारी कोनांबे येथील तळ्यावर पोहण्यासाठी गेले होते. दोघांनीही काठावर कपडे काढून पाण्यात उड्या घेतल्या. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही बुडू लागले. सदर प्रकार त्यांच्यासोबत असलेल्या चुलत भावाच्या लक्षात आल्याने त्याने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. त्याचा आवाज ऐकून समृद्धी महामार्गाच्या कामावरील सुरक्षारक्षक धावत आला. मात्र, त्यापूर्वीच दोघेही बुडाले होते. परिसरातील नागरिकांच्या मदतीने शोधकार्य सुरू करण्यात आले. सिन्नर नगर परिषद अग्निशमन दलाचे जवान व पांढुर्ली येथील जीवरक्षक गोविंद तुपे यांना पाचारण करण्यात आले. सुमारे दीड ते दोन तासाच्या प्रयत्नानंतर दोघांचेही मृतदेह हाती लागले. घटनेची माहिती मिळताच पोलीस हवालदार एच. ए. गोसावी, रामदास जाधव, बाबा पगारे, किरण पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर दोघांचेही मृतदेह सिन्नर नगरपालिका रु ग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले.