शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

शहरात दोन लाखांचे सोने लंपास दिवसभरात तीन घटना : सोनसाखळी चोरीचे सत्र सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 01:41 IST

शहरात सोनसाखळी चोरीचे सत्र सुरूच असून, विविध उपनगरीय भागांमध्ये भरदिवसा व संध्याकाळी सोनसाखळी चोरट्यांनी महिलांच्या गळ्यातील सौभाग्याचं लेणं हातोहात पळवून नेल्याचे उघडकीस आले आहे.

ठळक मुद्देचोरट्यांनी अशोकामार्गाला लक्ष्य केलेसोनसाखळी चोरीच्या घटना गुन्हा दाखल करण्यात आला

नाशिक : शहरात सोनसाखळी चोरीचे सत्र सुरूच असून, विविध उपनगरीय भागांमध्ये भरदिवसा व संध्याकाळी सोनसाखळी चोरट्यांनी महिलांच्या गळ्यातील सौभाग्याचं लेणं हातोहात पळवून नेल्याचे उघडकीस आले आहे. शनिवारी (दि.१७) शहरातील चार घटनांमध्ये सुमारे दोन लाखांचे सोने चोरट्यांनी पळवून नेल्याने संताप व्यक्त होत आहे.सोनसाखळी चोरीसाठी चोरट्यांनी अशोकामार्गाला लक्ष्य केले आहे. विशेष म्हणजे या मार्गावर पोलीस चौकी आहे व गस्त पथकाची वाहने सातत्याने या भागात गस्तीवर असतात तरीदेखील सोनसाखळी चोरीच्या घटना दरमहा या परिसरात होत असल्याने संतापाबरोबर आश्चर्य व्यक्त होत आहे. कल्पतरू उद्यानाच्या परिसरात नारायणनगर भागात राहणाºया राजकुमारी देवेंद्रसिंग ठाकूर (३५) या त्यांच्या मुलीसमवेत पायी घराकडे येत असताना चोरट्यांनी एका काळ्या रंगाच्या दुचाकीवरून येत समोरून ठाकूर यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळ काढल्याची घटना रात्री साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. ठाकूर यांच्या फिर्यादीवरून मुंबई नाका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध ३० हजार रुपये किमतीची सोन्याचे पान असलेली सोनसाखळी लंपास केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पादचारीसह दुचाकीवरील महिलाही ‘टार्गेट’सोनसाखळी चोरट्यांची मजल वाढली आहे. सकाळ-संध्याकाळ फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडणाºया महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरीच्या घटना घडत असताना चोरट्यांनी दुचाकीवरून जाणाºया महिलांच्या गळ्यातील सोनसाखळीही पळवून नेण्याचे धाडस केल्याचे समोर आले आहे. जेलरोडवरील गंधर्वनगरी परिसरात अ‍ॅक्टीवावरून पतीसमवेत जात असलेल्या ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरट्यांनी अशा पद्धतीने हिसकावून पळ काढला.