शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीसाठी दोन लाख शेतकºयांचे अर्ज?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 01:06 IST

राज्य सरकारने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेत कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या सुमारे दोन लाखांहून अधिक शेतकºयांनी कर्जमाफीचे अर्ज २२ सप्टेंबरच्या वाढीव अंतिम मुदतीत भरल्याचे वृत्त आहे. १२ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील एक लाख ७५ हजार शेतकºयांनी कर्जमाफीसाठी आॅनलाइन अर्ज भरल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

नाशिक : राज्य सरकारने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेत कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या सुमारे दोन लाखांहून अधिक शेतकºयांनी कर्जमाफीचे अर्ज २२ सप्टेंबरच्या वाढीव अंतिम मुदतीत भरल्याचे वृत्त आहे. १२ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील एक लाख ७५ हजार शेतकºयांनी कर्जमाफीसाठी आॅनलाइन अर्ज भरल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.  एकट्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचा विचार केला तर दीड लाखांच्या आत कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकरी सभासदांची संख्या जवळपास नव्वद हजारांच्या घरात असून, दीड लाखांपुढील मात्र कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकरी सभासदांची संख्या ३३ हजारांच्या घरात असल्याचे समजते. तसेच विहित मुदतीत कर्जफेड करणाºया शेतकºयांसाठीही शासनाने प्रोत्साहन योजना जाहीर केली असून, या योजनेसाठी सुमारे २५ हजार शेतकरी सभासद पात्र ठरले आहे. १२ सप्टेंबरअखेरपर्यंत जिल्हा बॅँकेसह अन्य राष्टÑीयीकृत बॅँकामध्ये कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या सुमारे १ लाख ७५ हजार शेतकºयांनी आॅनलाइन अर्ज केले होते. सुरुवातीला कर्जमाफीसाठी असलेली अंतिम मुदत १५ सप्टेंबर होती. मात्र नंतर शासनाने ही मुदत वाढवून २२ सप्टेंबर केली होती. या वाढीव मुदतीत दोन लाखांहून अधिक पात्र शेतकºयांनी कर्जमाफीसाठी आॅनलाइन अर्ज केल्याचे सूत्रांनी सांगितले. मध्यंतरीच्या काळात आॅनलाइन अर्ज दाखल करण्यासाठी शेतकरी बांधवांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. बहुतांश वेळ आॅनलाइन अर्ज भरण्याचे सर्व्हर डाउन असल्याच्या तक्रारी सर्व ठिकाणांहून येत होत्या. त्यामुळेच शासनाने कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकºयांना आॅनलाइन अर्ज दाखल करण्यासाठी आठवडाभराचा कालावधी वाढवून दिल्याची चर्चा होती.