शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

मराठा क्रांती मोर्चात सहभागी होणार दोन लाख बांधव

By admin | Updated: September 22, 2016 00:34 IST

सटाणा : झुणका-भाकर, पाणी सोबत ठेवण्याचे आवाहन; आज सायंकाळी गावागावांत कॅण्डल मार्च

सटाणा : नाशिक येथे होणाऱ्या मराठा क्रांती मूक मोर्चासाठी बागलाण तालुक्याचे नियोजन अंतिम टप्प्यात असून, तालुक्यामधून दोन लाख मराठा बांधव मोर्चात सहभागी होणार आहेत. त्यासाठी वाहने व इंधनाची सोयदेखील करण्याचे नियोजन पूर्ण झाले असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष रामचंद्रबापू पाटील यांनी दिली.आज बुधवारी मोर्चाच्या नियोजनासाठी येथे मराठा बांधवांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यात मार्गदर्शन करताना रामचंद्रबापू पाटील यांनी माहिती दिली. मोर्चासाठी जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. मोर्चात सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने झुणका-भाकर व पाणी सोबत ठेवण्याचे आवाहन केले आहे. मोर्चा सुरू असताना मोबाइलचा वापर कोणीही करू नये तसेच घनकचरादेखील रस्त्यावर फेकू नये, असे आवाहन करण्यात आले.आजच्या मेळाव्यात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अरविंद सोनवणे, डॉ. विलास बच्छाव, काका रौंदळ, संजय देवरे, शक्ती दळवी, लालचंद सोनवणे, किशोर कदम, मनोहर देवरे, खेमराज कोर, भास्कर सोनवणे, जिभाऊ सोनवणे, दिलीप सूर्यवंशी, कृष्णा भामरे, ज. ल. पाटील, भाऊसाहेब अहिरे, प्रकाश निकम, दिलीप अहिरे, अनिल ठाकरे, भालचंद्र गुंजाळ, विनोद पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. मेळाव्यास नानाजी दळवी, माजी नगराध्यक्ष विजय वाघ, पांडुरंग सोनवणे, संदीप सोनवणे, केवळ दळवी, दिलीप दळवी, दीपक रौंदळ, विजय दळवी, हरिकांत सूर्यवंशी, डॉ. भास्कर भामरे, निंबा पवार, किरण अहिरे, स्वप्नील देवरे, भगवान बच्छाव, साहेबराव सोनवणे, योगेश सोनवणे, आनंद सोनवणे, अंबादास सोनवणे, संजय ह्याळीज, केशव सोनवणे, श्रीराज पाटील, जगदीश अहिरे, मुरलीधर देवरे, रवींद्र भामरे, सुनील अहिरे आदि उपस्थित होते. (वार्ताहर)सर्व समाजबांधव होणार मराठा क्रांती मोर्चात सहभागीबागलाण तालुक्यातील राजपूत, माळी, धनगर, चर्मकार, मुस्लीम व जैन समाजाने मराठा क्र ांती मोर्चात सहभागी होऊन पाठिंबा दिल्याचे मेळाव्यात जाहीर करण्यात आले. मेळाव्यात मार्गदर्शन करताना रामचंद्रबापू पाटील यांनी यापुढे मराठा समाज व शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी आपण लढणार असल्याचे सांगत, हे काम करताना राजकारणाची दृष्ट लागू देणार नाही. बागलाण हा छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे. त्यामुळे मराठ्यांवर होणाऱ्या अत्याचाराची सहनशीलता संपली असून, त्याची क्र ांती या छत्रपतींच्या बागलाणमधून झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मोठ्या संख्येने सहभागी मोर्चाचे शिलेदार व्हावे, असे आवाहनही रामचंद्रबापू पाटील यांनी केले. मविप्रचे माजी उपसभापती डॉ. विलास बच्छाव म्हणाले की, मराठा समाज हा अठरा पगड जातींना घेऊन चालणारा समाज आहे. हा समाज आधीच दुष्काळाने आणि शेतमालाला भाव नसल्यामुळे संकटात सापडला असताना अ‍ॅट्रॉसिटीसारख्या जाचक कायद्याने पछाडले आहे. समाजबांधवांची एकजूट अशीच कायम ठेवून समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना ताकद देण्याचे काम हाती घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.शिक्षक, कर्मचारी होणार सहभागीबागलाण तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील मराठा समाजाच्या सुमारे साडेनऊशे शिक्षक व शिक्षिका कर्मचाऱ्यांनी आज येथील पंचायत समिती सभागृहात रामचंद्रबापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मेळावा घेऊन मोर्चात सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्या शिक्षकांजवळ चारचाकी वाहने ते स्वत:च्या वाहनाने मोर्चात सहभागी होणार असल्याचे जाहीर केले. विद्यार्थीदेखील सहभागी होणार असल्याने शाळा- महाविद्यालयांना सुटी राहणार आहे. आज सायंकाळी गावागावांत कॅँडल मार्च ४मराठा क्र ांती मूक मोर्चाच्या जनजागृतीसाठी बागलाण तालुक्यातील प्रत्येक गावात सायंकाळी सहा वाजता मराठा समाज एकत्र जमून गावातून कॅँडल मार्च काढण्याचा निर्णय आजच्या मेळाव्यात घेण्यात आला. हा कॅँडल मार्च कोपर्डी घटनेचा निषेध म्हणून राहणार असून, त्यानंतर छत्रपती शिवराय व माता जिजाऊंना अभिवादन करून त्याचा समारोप करण्यात येणार आहे.