शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

घोटीजवळ अपघातात दोघे ठार; एक गंभीर

By admin | Updated: January 18, 2017 01:09 IST

मुंबई-नाशिक महार्गावरील माणिकखांबजवळील घटना

घोटी : मुंबई - नाशिक महामार्गावर मुंबईकडून नाशिककडे जाणाऱ्या गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचे पुढील टायर फुटल्याने टॅँकर दुभाजक तोडून मुंबईकडे जाणाऱ्या एका वाहनावर आदळल्याने झालेल्या अपघातात दोनजण जागीच ठार, तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली.  याबाबत घोटी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, टँकरचालक फरार आहे. महामार्गावर घोटीजवळ नाशिककडे जाणाऱ्या गॅस टँकरचे  (क्र. जीजे १२ एडब्लू ०९७६) पुढील टायर अचानक फुटल्याने टँकर दुभाजक तोडून मुंबईकडे जाणाऱ्या अ‍ॅसेन्ट कार (क्र. एमएच ४८ एफ ३०७३)वर आदळून अपघात झाला. या अपघातात कारमधील समीर शेख ( ३८) व संजय कुमार शुक्ला (२७) हे दोघे जण जागीच ठार झाले, तर खत्री (पूर्ण नाव व पत्ता समजू शकला नाही) हे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच घोटी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन स्थानिक युवकांच्या मदतीने वाहनात अडकलेले मृतदेह व जखमीना बाहेर काढले. जखमीला तातडीने पुढील उपचारार्थ नाशिकच्या जिल्हा रु ग्णालयात हलविले. महामार्ग एक तास ठप्पअपघात झाल्यानंतर इगतपुरी तालुक्यातील एकही रु ग्णवाहिका अथवा आपत्कालीन यंत्रणा वेळीच न आल्याने महामार्गावरील वाहतूक तब्बल एक तास ठप्प झाली. अखेर घटनास्थळी पोहचलेले घोटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश वाघ, उपनिरीक्षक कमलेश बच्छाव, संदीप शिंदे, नितीन भालेराव, राजेंद्र कांगने आदिंनी अपघातग्रस्त वाहने बाजूला काढून महामार्ग वाहतुकीसाठी खुला केला.