शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

दोनशे वाड्या-वस्त्यांना हवे नावाचे ‘गाव’

By admin | Updated: June 27, 2014 00:11 IST

दोनशे वाड्या-वस्त्यांना हवे नावाचे ‘गाव’

 

नाशिक : आदिवासी बहुल क्षेत्रातील वाड्या-वस्त्यांनी त्यांना स्वतंत्र हक्काचे नाव असलेले ‘गाव’ असल्याची मागणी केल्यास आता तसे प्रत्यक्षात त्या वाड्या-वस्त्यांना गावाचा दर्जा मिळणार आहे. शासनाच्या या निर्णयाचा लाभ उचलण्यासाठी जिल्ह्णातील नऊ तालुक्यांतील २० वाड्या-वस्त्यांनी त्यांना गावाचा दर्जा मिळावा, म्हणून ग्रामसभेचे ठराव मंजूर करून तसेच प्रस्ताव प्रांत कार्यालयास सादर केले आहेत.शासनाने पेसा (आदिवासी प्रक्षेत्र) कायद्यानुसार ज्या वाड्या, वस्त्या, तांडे व पाडे यांनी त्यांच्या लोकसंख्येच्या ५० टक्के ग्रामस्थांनी मागणी केल्यास त्या वाड्या-वस्त्यांना, गावाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रधानसचिव परिमल सिंह यांनी नाशिक दौऱ्यात नुकतीच त्यासंदर्भात माहिती दिली. गावाचा दर्जा देण्यास लोकसंख्येची अट टाकण्यात आलेली नाही. मात्र किमान पन्नास टक्के ग्रामस्थांची तशी मागणी हवी, अशी अट आहे. जिल्ह्णात आजमितीस १३८० ग्रामपंचायती, तर १९२० महसुली गावे आहेत. मागील वर्षापर्यंत १३७६ ग्रामपंचायती होत्या, त्यात खरपडी (पेठ), पुनदनगर (कळवण), मोडाळे व कुशेगाव (इगतपुरी) या चार नवीन ग्रामपंचायतींचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. नऊ आदिवासी तालुक्यांचा विचार केला, तर या नऊ तालुक्यांत ५६७ ग्रामपंचायती तर ९५२ महसुली गावे आहेत. आता पेसा कायद्यानुसार २०६ वाड्या-वस्त्यांनी त्यांना गावाचा दर्जा देण्याबाबत प्रस्ताव सादर केलेले आहेत. त्यात इगतपुरी-१८, पेठ-४, त्र्यंबकेश्वर-३, कळवण-५६, सुरगाणा-७४, नाशिक-४, देवळा-३, दिंडोरी-४, बागलाण-३७ अशा २०६ वाड्यांचा समावेश आहे. प्रांत कार्यालयाकडून हे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आल्यानंतर त्यांना गावाचा दर्जा देण्याबाबत निर्णय होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.(प्रतिनिधी)