शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलन करणाऱ्या दोनशे शेतकऱ्यांना अटक

By admin | Updated: June 6, 2017 01:42 IST

कळवण : कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी दि. १ जूनपासून संपावर गेलेल्या कळवण शहर व तालुक्यातील शेतकऱ्यांनी अखेर सरकारविरोधात कळवण शहर व तालुका बंदचा आसूड उगारला.

लोकमत न्यूज नेटवर्ककळवण : कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी दि. १ जूनपासून संपावर गेलेल्या कळवण शहर व तालुक्यातील शेतकऱ्यांनी अखेर सरकारविरोधात कळवण शहर व तालुका बंदचा आसूड उगारला. यात व्यापारी व व्यावसायिकांनी सहभागी होत पाठिंबा दिला. कळवणसह अभोणा, कनाशी आदी आदिवासी भागात १०० टक्के बंद पाळण्यात आला. कळवण बसस्थानकाजवळ तब्बल दोन तास शेतकरी तळ ठोकून होते. यावेळी कळवण पोलिसांनी दोनशे-तीनशे राजकीय पक्ष पदाधिकारी व शेतकऱ्यांना अटक करु न नंतर सोडून दिले.शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष देवीदास पवार, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख कारभारी आहेर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोविंद पगार, मविप्र संचालक रवींद्र देवरे, जिल्हा युवक कॉँग्रेसचे माजी अध्यक्ष शैलेश पवार, शेतकरी नेते शांताराम जाधव, शिवसेना तालुकाप्रमुख जितेंद्र वाघ, समता परिषदेचे कौतिक गांगुर्डे, प्रदेश उपाध्यक्ष माणिक देवरे आदींच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.कळवण शहरात मोटारसायकल रॅली काढून बंदचे आवाहन करण्यात आले होते. बसस्थानकाजवळ शेतकरी नेते व शेतकरी बांधवांनी एकत्र येत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सदाभाऊ खोत व जयाजी सूर्यवंशी यांच्या विरोधात घोषणाबाजी करत भाजपा सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. यावेळी बसस्थानकामधून एकही बस बाहेर पडू न देण्याचा इशारा देऊन दोन तास बसस्थानकाजवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. संपाला पाच दिवस होत असताना राज्य सरकारने कर्जमाफीबाबत कोणतीच भूमिका न घेतल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली. राज्यभरातील शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून आपल्या भावना प्रकट करीत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पोलीस खोटे गृन्हे नोंदवून आंदोलक शेतकऱ्यांवर कारवाई करीत असल्याची तक्रार यावेळी करण्यात आली. शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष देवीदास पवार यांनी, शेतकरी संप सुरूच राहणार असून, कोण्याही शेतकऱ्याने गुजरात राज्याकडे व शहराकडे भाजीपाला व शेतमाल पाठवू नये. दळवट येथे तीन दिवस मोठे आंदोलन होऊन पोलिसांना गोळीबार करावा लागला. त्यामुळे संप शेतकरी बांधवांनी हातात घेतला असल्याने संपाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. शेतकरी नेते शांताराम जाधव यांनी राज्य सरकारने आश्वासने दिली असली तरी ती मान्य नसल्याने हे आंदोलन सुरू ठेवण्यात येणार असल्याचे सांगून संप काळात शेतमालाची वाहतूक करणारे शेतकरी व त्यांची गावे जनतेला समजू द्या, त्यांना त्या पध्दतीने उत्तर देण्याचा इशारा देऊन संप यशस्वी करण्याची शपथ दिली. शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख कारभारी आहेर यांनी सरकारवर जोरदार टीका करून शेतकरी आता आक्र मक झाला आहे. शेतकरी संपात शिवसेना अग्रभागी असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, नाशिक जिल्हा युवक कॉँग्रेसचे माजी अध्यक्ष शैलेश पवार, समता परिषदेचे कौतिक गांगुर्डे यांनी मनोगत व्यक्त करून शेतकरी संप यशस्वी करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. यावेळी देवराम कृष्णा पगार, शरद गुंजाळ, चंद्रकांत पवार, घनश्याम पवार, विलास रौंदळ, माणिक देवरे, पोपट पवार, दिलीप देशमुख, भिला पवार, रामा पाटील, योगेश खैरनार, गोरख खैरनार, मुरलीधर पगार, हरिभाऊ वाघ, विनोद खैरनार, नरेंद्र वाघ, नितीन पवार, सुनील गांगुर्डे, बापू जगताप, अमोल पगार, भाऊसाहेब पवार, दीपक पवार, साहेबराव निकम, शरद गांगुर्डे, राकेश गुंजाळ आदीसह असंख्य शेतकरी उपस्थित होते.