नाशिक : उपनगर पोलीस ठाणे हद्दीत चोरी व घरफोडीची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, दोन घटनांमध्ये चोरट्यांनी पन्नास हजारांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे़शैलेश डी. कटकमवार (रा. बॉम्बे हाउस सोसायटी, उपनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुरुवारी (दि़६) मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी घराच्या किचनमधील उघड्या खिडकीतून प्रवेश करून २५ हजार ८०० रुपयांचा ऐवज चोरून नेला़ त्यामध्ये पाच मोबाइल, महत्त्वाची कागदपत्रे, रोख रकमेचा समावेश आहे़ याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़दुसरी घटना टाकळी रोडवरील अपूर्वा कॉलनीत घडली़ रमेश कचरू बस्ते यांच्या घरातील किचनच्या खिडकीचे गज कापून चोरट्यांनी घरात प्रवेश केला़ तसेच घरातील २२ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली़ याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)
उपनगरला दोन घरफोड्यांमध्ये पन्नास हजारांचा ऐवज लंपास
By admin | Updated: April 8, 2017 16:58 IST