शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

सत्ताधारी एकता पॅनलमध्येच दोन गट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 00:35 IST

निमा निवडणुकीत सत्ताधारी एकता पॅनलमध्ये एकमत न झाल्याने दोन गट पडले असून, समेट घडवून आणण्याच्या दृष्टीने तीनही पॅनलच्या नेत्यांनी विनंती केल्यानुसार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी माघारीसाठी एक दिवसाची मुदत वाढवून दिली आहे, तर एकता पॅनलमध्ये फूट पडल्याने तिसरे पॅनल निवडणुकीत उतरण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सातपूर: निमा निवडणुकीत सत्ताधारी एकता पॅनलमध्ये एकमत न झाल्याने दोन गट पडले असून, समेट घडवून आणण्याच्या दृष्टीने तीनही पॅनलच्या नेत्यांनी विनंती केल्यानुसार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी माघारीसाठी एक दिवसाची मुदत वाढवून दिली आहे, तर एकता पॅनलमध्ये फूट पडल्याने तिसरे पॅनल निवडणुकीत उतरण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.  निमाच्या द्वैवार्षिक निवडणुकीत रविवारी उमेदवारी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस होता. सत्ताधारी एकता पॅनलच्या काही ठराविक जागेवर उमेदवारांचे एकमत होत नसल्याने सरळसरळ दोन गट पडले आहेत. या दोन्ही गटांकडून निवडणूक लढविण्याची जोरदार तयारी दर्शविली आहे. त्यामुळे माघारीच्या दिवशी माघारीचे अर्ज देण्याऐवजी समेट घडविण्याच्या दृष्टीने सत्ताधारी दोनही गट आणि उद्योग विकास पॅनेलने निवडणूक निर्णय अधिकाºयांना माघारीसाठी एक दिवसाची मुदत वाढवून देण्याची मागणी केली. ही मागणी मान्य करीत निवडणूक निर्णय अधिकाºयांनी सोमवारपर्यंत माघारीची मुदत वाढवून दिली आहे. दरम्यान, उमेदवारी माघारीच्या शेवटच्या दिवसापर्यंत २९ उमेदवारांनी माघार घेतली आहे.  सत्ताधारी एकता पॅनलच्या विरोधात उद्योग विकास पॅनल निवडणूक रिंगणात उतरले आहे. म्हणून एकता पॅनलच्या श्रेष्ठींमध्ये गेल्या आठ दिवसांपासून चर्चेचे गुºहाळ सुरू होते. नाराज बंडखोरांकडून तिसºया पॅनलची निर्मिती होण्याची शक्यता गृहीत धरून उमेदवारी जाहीर केली जात नव्हती. शेवटी उमेदवारी माघारीच्या दिवशी जे व्हायचे ते झालेच. उमेदवारी देण्यावरून सत्ताधारी एकता पॅनलमध्ये एकमत न झाल्याने एकता दुभंगली आणि एकता पॅनेलमध्ये दोन गट तयार झाले आहेत. आता एकता विरुद्ध एकता आणि उद्योग विकास असे तीन पॅनल निवडणूक रिंगणात उतरणार आहेत.

टॅग्स :Electionनिवडणूक