शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
3
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
4
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
5
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
6
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
7
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
8
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
9
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
10
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
11
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
12
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
13
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
14
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
15
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
16
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
17
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
18
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
20
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!

आजीसह दोन नातवंडांचा बुडून मृत्यू खिराड धरण : घागबारी गावावर शोककळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 00:06 IST

सुरगाणा : दिंडोरी, कळवण व सुरगाणा तालुक्यांच्या सीमेवर असलेल्या घागबारीजवळील खिराड धरणात बुडून आजीसह दोन नातवंडांचा बुडून मृत्यू झाला.

ठळक मुद्देदोन्ही भावंडे पाण्यात डुबक्या मारून खेळत होतीबहीण घाबरल्याने तिने भावाला घट्ट मिठी मारली

सुरगाणा : दिंडोरी, कळवण व सुरगाणा तालुक्यांच्या सीमेवर असलेल्या घागबारीजवळील खिराड धरणात बुडून आजीसह दोन नातवंडांचा बुडून मृत्यू झाला. यामुळे गावावर शोककळा पसरली आहे. घागबारी जिल्हा परिषद शाळेत पाचवीत शिकणारा योगेश रामचंद्र गायकवाड (११) व तिसरीत शिकणारी मोनिका रामचंद्र गायकवाड (९) सोमवारी (दि. ५) शाळा सुटल्यानंतर दुपारी दोन ते अडीच वाजेच्या सुमारास आजी मांगीबाई लक्ष्मण गायकवाड (५३) जवळच असलेल्या धरणाजवळ कपडे धुण्यासाठी सोबत घेऊन गेल्या. धरणावर आजी कपडे धुवत असताना ही दोन्ही भावंडे पाण्यात डुबक्या मारून खेळत होती. दरम्यान, मोनिकाचा पाय घसरल्याने ती खोल पाण्यात बुडू लागली. योगेशच्या हे लक्षात येताच, बहिणीला वाचविण्यासाठी तोही खोल पाण्यात गेला. बहीण घाबरल्याने तिने भावाला घट्ट मिठी मारली. दोन्ही भावंडे पाण्यात बुडत असल्याचे पाहताच आजी मांगीबाई हिने दोघांना वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतली.दोघा भावंडांच्या नाकातोंडात पाणी गेल्याने घाबरलेल्या अवस्थेत त्यांनी आजीलाही घट्ट मिठी मारल्याने आजीही पाण्यात बुडू लागली. दरम्यान, आजीचा नातू युवराज गावित (६) (मुलीचा मुलगा) याने ही घटना पाहून आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. युवराज धरणाच्या काठावर खेळत होता म्हणून तो वाचला. आजूबाजूला असलेले शेतात काम करणारे गावकरी मदतीला धावून आले; मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. या तिघा मायलेकरांचा धरणात बुडून दुर्दैवी अंत झाला होता. या घटनेने शोककळा पसरली आहे.