शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याकडून दोन शेळ्या फस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 22:56 IST

वटार : येथील सावतावाडी वस्तीवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात जिभाऊ दगा बागुल यांच्या दोन गाभण शेळ्या ठार झाल्या. मंगळवारी दुपारी चार ते पाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. बिबट्याचा मुक्त संचार असल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. परिसरात बिबट्याचा वावर नित्याचा झाला आहे. येथील शेतकरी पशुपालन करणारा असून, दुभती जनावरे मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे पशुधन धोक्यात आले आहे.

ठळक मुद्देखबरदारीची उपाययोजना म्हणून वनविभागाने लक्ष घालून परिसरात पिंजरे लावावे

ग्रामस्थ भयभीत : वटार परिसरातील पशुधन धोक्यात; पिंजरा लावण्याची मागणी

 

वटार : येथील सावतावाडी वस्तीवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात जिभाऊ दगा बागुल यांच्या दोन गाभण शेळ्या ठार झाल्या. मंगळवारी दुपारी चार ते पाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. बिबट्याचा मुक्त संचार असल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. परिसरात बिबट्याचा वावर नित्याचा झाला आहे. येथील शेतकरी पशुपालन करणारा असून, दुभती जनावरे मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे पशुधन धोक्यात आले आहे.येथील शेतकरी बाबा जयराम बागुल यांच्या पाच शेळ्या एकाच रात्री फस्त केल्या होत्या. या घटनेला आठ दिवस होत नाही तोच पुन्हा बिबट्याने दोन शेळ्या फस्त केल्या. गेल्या काही दिवसांपूर्वी पारडू फस्त केले होते. एकाच महिन्यात तीन हल्ल्यात आठ प्राण्यांचा बळी गेला आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी वेळोवेळी मागणी करूनही वनविभाग पिंजरा का लावत नाही, असा प्रश्न रहिवाशांनी उपस्थित केला आहे.सावतावाडी परिसरात बिबट्याचा बºयाच दिवसांपासून वावर असून, शेतकºयांना अनेकवेळा दर्शनही झाले आहे. दरवर्षी पाण्याच्या शोधात बिबटे गाव वस्तीवर येतात व पाळीव प्राण्यांवर ताव मारतात. लपण्यासाठी परिसरात मोठी काटेरी जुडपे असल्याने बिबट्यांचा वावर नित्याचा झाला आहे.वनविभागाच्या हलगर्जीपणामुळे गेल्या तीन ते चार महिन्यांत परिसरातील २० पाळीव प्राण्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. बिबट्याचे हल्ले असेच सुरू राहिले तर मानवालासुद्धा जीव गमवावा लागण्याची भीती नागरिकांमधून व्यक्त होत आहे.मंगळवारी घडलेल्या घटनेची माहिती वनविभागाला कळवली असता, बोरसे यांनी वस्तीवर येऊन पंचनामा केला. यावेळी परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते. खबरदारीची उपाययोजना म्हणून वनविभागाने लक्ष घालून परिसरात पिंजरे लावावे, अशी मागणी परिसरातील शेतकºयांनी केलीआहे.यावेळी जिभाऊ खैरनार, उपसरपंच जितेंद्र शिंदे, पोलीसपाटील किरण खैरनार, मच्छिंद्र बागुल, जिभाऊ बागुल, हिरामण बागुल, हरी बागुल आदी शेतकरी उपस्थित होते.हिंस्त्र प्राण्यांच्या हल्ल्यांत दरवर्षी चार ते पाच मेंढ्यांचा बळी जात असल्याने मेंढपाळ जेरीस आले आहेत. येथील शेतकरी पशुपालन करणारा असून, शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय करतो. बिबट्याचा वावर असल्यामुळे वाड्या वस्त्यांवरील शेतकºयांना रात्र जागून काढावी लागत आहे. मेंढपाळ रात्रीच्या वेळी फटाके फोडून आपल्या पशुधनाचे रक्षण करत आहे.