शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात कर्जामुळे दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या

By admin | Updated: September 2, 2016 22:17 IST

जिल्ह्यात कर्जामुळे दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या

 सिन्नर : तालुक्यातल्या धनगरवाडी (पिंपळगाव) येथील शेतकऱ्याने कर्जबाजारीपणामुळे आत्महत्त्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सिन्नर तालुक्यातील रघुनाथ पंडीत डुंबरे (५८) यांची सुमारे पाच एकर शेतजमिन आहे. गेल्या पाच वर्षापासून पावसाचे प्रमाण कमी असल्याने त्यांचे शेतीत उत्पन्न कमी होते. डुंबरे यांनी महाराष्ट्र बॅँक व विकास संस्थेकडून कर्ज घेतले होते. या कर्जाचे वेळेवर हप्ते फेडले जात नसल्याने ते गेल्या काही दिवसांपासून तणावाखाली असल्याची माहिती त्यांच्या मुलाने सांगितले. दिवसेंदिवस कर्जाची रक्कम वाढत असल्याने ते निराश झाले होते. शुक्रवारी सकाळी त्यांनी कडवा कालव्याशेजारी असणाऱ्या सुमारे २५ फूट खोल पाण्याने भरलेल्या खड्यात उडी घेवून जीवनयात्रा संपवली. कडवा कालव्याच्या चारीचे गेट उडण्यासाठी आलेल्या पाटबंधारे खात्याचे कर्मचारी व काही शेतकऱ्यांनी सदर घटना पाहिली. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र तोपर्यंत डुंबरे यांचा मृत्यू झाला होता. रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर डुंबरे यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक हरिभाऊ कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार जी. एन. गुरुळे, एस. एम. साळवे अधिक तपास करीत आहेत. सटाणा : एक अल्पभूधारक शेतकर्याने ऐन पोळ्याच्या दिवशीच विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना गुरु वारी रात्री तालुकयातील मुळाणे येथे घडली.हिरामण खंडू नाडेकर (वय 45) असे या आत्महत्याग्रस्त शेतकर्याचे नाव आहे. सोसायटी व एक राष्ट्रीयकृत बँकेचे नाडेकर यांच्यावर साडेतीन लाखांचे कर्ज होते.कर्ज फेडण्याच्या विवंचनेतूनच त्यांनी विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली असल्याचे बोलले जात आहे.एकीकडे सर्वत्र उत्साहात पोळा साजरा होत असताना तालुक्यातील मुळाणे गावात नाडेकर यांनी विहिरीत उडी घेवून आत्महत्या केल्याने गाव शोक सागरात बुडाले होते.सटाणा ग्रामीण रु ग्णालयात नाडेकर यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून काल रात्री उशिरा त्यांच्यावर मुळाणे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.सटाणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला. आज राज्य कर्मचार्यांचा एक दिवसीय संप असल्याने तहसीलकडून अधिकृत माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही.