शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबूतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
4
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
5
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
6
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
7
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
8
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
9
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
10
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
11
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
12
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
13
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
14
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
15
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
16
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
17
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
18
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
19
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
20
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."

बागलाणमध्ये कर्जबाजारीपणाला कंटाळून दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 00:36 IST

सटाणा : बागलाण तालुक्यात कर्जबाजारीपणा व शेतमालाला भाव मिळत नसल्याने आलेल्या नैराश्येतून दोन युवा शेतकºयांनी जीवन संपविल्याच्या घटना घडल्या आहेत. तालुक्यातील भडाणे येथील शेतकरी तात्याभाऊ साहेबराव खैरनार (३७) यांनी कांदाचाळीत गळफास लावून आत्महत्या केली, तर सारदे येथील शेतकरी मनोज रामराव धोंडगे (३२) यांनी विष प्राशन करून मृत्यूला कवटाळले. 

ठळक मुद्देतालुक्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे.

सटाणा : बागलाण तालुक्यात कर्जबाजारीपणा व शेतमालाला भाव मिळत नसल्याने आलेल्या नैराश्येतून दोन युवा शेतकºयांनी जीवन संपविल्याच्या घटना घडल्या आहेत. तालुक्यातील भडाणे येथील शेतकरी तात्याभाऊ साहेबराव खैरनार (३७) यांनी कांदाचाळीत गळफास लावून आत्महत्या केली, तर सारदे येथील शेतकरी मनोज रामराव धोंडगे (३२) यांनी विष प्राशन करून मृत्यूला कवटाळले. केंद्र शासन शेतीविषयी चुकीचे धोरण अवलंबत असल्यानेच आत्महत्यांचे प्रमाण वाढले असल्याची चर्चा शेतकºयांमध्ये केली जात आहे. भडाणे येथील शेतकरी तात्याभाऊ खैरनार यांनी एका बॅँकेकडून कर्ज घेतले होते तसेच काही रक्कम हातउसनवार घेतली होती. खैरनार यांनी कांद्याला भाव वाढतील या अपेक्षेने चाळीत तब्बल पाचशे क्विंटल वर कांदा साठवून ठेवला होता. मात्र कृषी उत्पन्न बाजार समितीत अवघ्या शंभर ते दीडशे रुपये भावात कांदा विकला जात असल्याने पुढील कर्ज व देणेकºयांचे घेतलेले पैसे फेडणार तरी कसे या विवंचनेत ते सापडले होते. कांद्याचे भाव कोसळतच असल्याचे पाहून ते हताश झाले होते. गेल्या काही दिवसांपासून नैराश्येच्या गर्तेत सापडलेले तात्याभाऊ खैरनार अस्वथ झाले होते. त्यांनी शुक्र वारी शेतातील कांदा चाळीतच गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली.तहसीलदार प्रमोद हिले यांनी कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. तात्याभाऊ खैरनार यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. जायखेडा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली गोरख गर्दे करीत आहेत.दुसºया घटनेत सारदे (ता. बागलाण) येथील कर्जबाजारी तरुण शेतकरी मनोज रामराव धोंडगे यांनी शुक्र वारी शेतात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. नातेवाइकांनी त्यांना मालेगाव येथील सामान्य रु ग्णालय दाखल केले होते. मात्र उपचारादरम्यान शनिवारी (दि.८) सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. एका वर्षापूर्वीच त्यांच्या पत्नी व मुलाचे निधन झाले होते. शेतातील पाण्याच्या नियोजनासाठी धोंडगे यांनी शेततळे तयार केले होते. शेतीत डाळिंब व कांद्याची लागवड केली होती. शेतपिकांना भाव नसल्याने सातबारा उताºयावरचा बॅँक आॅफ महाराष्ट्र या बॅँकेचा एकवीस लाखांचा बोजा कमी कसा करावा या विवंचनेत ते होते. अनेक दिवसांपासून त्यांची चलबीचलत वाढली असल्याचे सांगितले जाते. कर्जाचा वाढता डोंगर आणि घेतलेले कर्ज फेडणार कसे याच नैराश्येतून त्यांनी विष प्राशन करून मृत्यूला कवटाळले असल्याचे बोलले जात आहे. जायखेडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. तहसीलदार प्रमोद हिले यांनीही भेट दिली. जायखेडा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मनोज धोंडगे यांच्या पश्चात सहा वर्षांची मुलगी व आईवडील असा परिवार आहे.कोट-शेतकºयांच्या आत्महत्या ही अत्यंत दु:खद घटना आहे. शासन पीडित परिवारांसोबत आहे. यावर्षी जरी पाऊस कमी पडला असला तरी पुढील वर्षी चांगला पडेल अशी आशा बाळगू. शेतकºयांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये.- प्रमोद हिले, तहसीलदार बागलाण.तालुक्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. जनावरांना चारा नाही तसेच विहिरींनीही तळ गाठल्याने पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण भटकंती करावी लागत आहे. बहुतांश शेतकºयांनी पाण्याअभावी कमी क्षेत्रात कांदा लागवड केली. मात्र पाण्याअभावी लागवड केलेला कांदा सोडून देण्याची वेळ येऊन ठेपली आहे. त्यातच आजमितीला कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी आपल्या जीवाला वैतागले असल्याचे चित्र आहे.- भाऊसाहेब भामरे, सभापती, नामपूर बाजार समिती