शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

तुकाराम दिघोळेंसह दोन संचालकांचे राजीनामे

By admin | Updated: May 28, 2014 01:04 IST

नासाका संचालकांत खळबळ : वीजपुरवठा केला खंडित

नासाका संचालकांत खळबळ : वीजपुरवठा केला खंडितनाशिक : नाशिक सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी संचालक मंडळ आणि कामगार युनियनकडून शर्थीचे प्रयत्न केले जात असतानाच, नासाकाच्या तीन संचालकांनी राजीनामा दिल्याचे वृत्त आहे. त्यात भरीस भर म्हणून दीड लाखाची वीजप˜ी थकल्याने महावितरणने नासाकाचा वीजपुरवठा खंडित केल्याने तीन दिवसांपासून नासाका अंधारात बुडाला आहे.आठवडाभरापूर्वीच नासाकाच्या कार्यक्षेत्रावर संचालक, सभासद व संचालकांची बैठक होऊन नासाका बंद होण्यापासून वाचविण्यासंदर्भात चर्चा झाली होती. त्यानंतर कारखान्याची सुमारे २५ ते ३० कोटींची शंभर क्िंवटल साखरेची पोती विकण्यासंदर्भात जिल्हा बॅँक व नासाका व्यवस्थापन व कामगार युनियन यांची संयुक्त बैठक होऊन त्यात यासंदर्भात चर्चा झाली होती. नाशिक साखर कारखान्याकडे महावितरणची दीड लाखाची थकबाकी असल्याने महावितरणने नासाकाचा वीजपुरवठा खंडित केल्याने गेल्या तीन दिवसांपासून नासाका अंधारात आहे. त्याचप्रमाणे नाशिक साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष व माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांच्यासह संतू पाटील व केरू पाटील धात्रक या तीन संचालकांनी राजीनामा दिल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. नासाकाची अवस्था बिकट असल्याने पुन्हा नासाका सुरू होण्याची शक्यता फारच कमी असल्यानेच या तीन संचालकांनी राजीनामे दिल्याची चर्चा असली, तरी या तीनही संचालकांनी राजीनामा घरगुती अडचणीमुळे देत असल्याचे नमूद केले आहे. हे राजीनामे व्यवस्थापक देवीदास मोठे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले असून, येत्या ३० मेनंतर संचालक मंडळाची बैठक होणार असून, बैठकीत हे राजीनामे मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे नासाकाचा वीजपुरवठा पूर्ववत सुरळीत होण्यासाठी दीड लाखाची मदत जिल्हा बॅँकेच्या वतीने नासाकाला करण्यात येणार असल्याचे समजते. (प्रतिनिधी)