शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

मतदानापूर्वी दोन दिवस ‘ड्राय डे’

By श्याम बागुल | Updated: April 10, 2019 16:05 IST

लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीपासूनच निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांकडून समर्थक व मतदारांचा कौल आजमाविण्याची प्रकिया सुरू करण्यात आली. त्यानुसार दिवसभर थकलेल्या कार्यकर्त्यांचा श्रमपरिहार रात्रीच्या ‘बैठकी’तून काढण्यावर भर देण्यात आला. त्यामुळे गेल्या महिन्यापासून शहरातील हॉटेल्स, ढाब्यांवर नेहमीपेक्षा जास्त गर्दी होऊ

ठळक मुद्देमतमोजणीनंतरही तळीरामांचा घसा कोरडा राहणार

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : लोकसभा निवडणूक मतदानाच्या कालावधीत उमेदवार व राजकीय पक्षांकडून मतदारांना मोठ्या प्रमाणात दारूचे वाटप केले जाते, ते रोखण्याबरोबरच दारूच्या नशेत कायदा व सुव्यवस्था धोक्यात येण्याचा धोका लक्षात घेऊन निवडणूक आयोगाच्या सूचनेवरून यंदा उमेदवारांच्या प्रचाराची समाप्ती होताच, दारू विक्रीची दुकानेही बंद करण्यात येणार असून, थेट मतदान संपल्यानंतर तीन दिवसांनी तळीरामांची सोय होणार आहे.

लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीपासूनच निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांकडून समर्थक व मतदारांचा कौल आजमाविण्याची प्रकिया सुरू करण्यात आली. त्यानुसार दिवसभर थकलेल्या कार्यकर्त्यांचा श्रमपरिहार रात्रीच्या ‘बैठकी’तून काढण्यावर भर देण्यात आला. त्यामुळे गेल्या महिन्यापासून शहरातील हॉटेल्स, ढाब्यांवर नेहमीपेक्षा जास्त गर्दी होऊ लागली असून, त्यात निवडणुकांच्या विषयांवर गप्पांचे फड रंगू लागले आहेत. कार्यकर्त्यांच्या बाबतीत उमेदवाराकडून ही सोय केली जात असली तरी प्रत्यक्ष मतदानाच्या आदल्या दिवशी विशेष करून झोपडपट्टीवासीय मतदारांना राजकीय पक्षांकडून दारूचे वाटप केले जात असल्याच्या घटना घडल्या आहेत. त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी व मतदारांना दाखविण्यात येणाऱ्या आमिषाला चाप बसविण्यासाठी निवडणूक आयोगाने मतदानाच्या ४८ तास अगोदर सर्व प्रकारच्या मद्यविक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील सर्व मद्यविक्रीची दुकाने, परमिट रूम, देशी दारू, ताडी विक्री केंद्रे २७ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजेनंतर बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी जारी केले आहेत. उमेदवारांचा जाहीर प्रचारही २७ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता संपुष्टात येणार आहे. त्यादृष्टीने दारू विक्रीची दुकानेही बंद केले जातील. २८ व २९ एप्रिल रोजी दोन्ही दिवस ही दुकाने बंद राहतील. त्यामुळे अडीच दिवस तळीरामांची गैरसोय होणार आहे. मतमोजणीच्या दिवशीही दुपारपर्यंत जरी निकाल जाहीर होणार असले तरी, त्यादिवशी संपूर्ण दिवसभर मद्यविक्री बंद ठेवण्याबरोबरच, मतमोजणी संपल्यानंतर पुढील बारा तासांपर्यंत बंदी कायम राहणार आहे. त्यामुळे निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी उमेदवाराच्या मिरवणुकीत ‘झिंग झिंग झिंगाट’ करणे कार्यकर्त्यांना शक्य होणार नाही.

टॅग्स :Electionनिवडणूकnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय