शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

माघारीसाठी दोन दिवस शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 00:49 IST

नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) निवडणुकीत तिसऱ्या पॅनेलची शक्यता गृहीत धरून संभाव्य बंडखोरांना रोखण्यासाठी सत्ताधारी एकता पॅनलकडून व्यूहरचना केली जात असल्यामुळेच पॅनलच्या उमेदवारांची नावे जाहीर केले जात नाही.

सातपूर : नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) निवडणुकीत तिसऱ्या पॅनेलची शक्यता गृहीत धरून संभाव्य बंडखोरांना रोखण्यासाठी सत्ताधारी एकता पॅनलकडून व्यूहरचना केली जात असल्यामुळेच पॅनलच्या उमेदवारांची नावे जाहीर केले जात नाही. त्यामुळे इच्छुक उमेदवारांची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, उद्योग विकास पॅनेलने सिन्नरपासून प्रचाराला सुरुवात केली आहे.  निमा निवडणुकीत सत्ताधारी एकता पॅनलच्या विरोधात उद्योग विकास पॅनल उभे ठाकले आहे. एकता पॅनलकडे इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी आहे. ४१ जागांसाठी ८३ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत. प्रत्येक जागेसाठी चुरस आहेच. पहिल्या वर्षी उपाध्यक्ष (लघु उद्योग) असलेल्या दुसºया वर्षी अध्यक्षपद मिळत असल्याने उपाध्यक्ष पदासाठी चार उमेदवार इच्छुक आहेत. त्यामुळे सत्ताधारी गटाची डोकेदुखी वाढणार आहे. परिणामी उमेदवारी नाकारली म्हणून बंडखोरी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तसे झाल्यास तिसºया पॅनलची निर्मिती होऊ शकते. बंडखोरी टाळण्यासाठी व तिसरे पॅनल रोखण्यासाठी श्रेष्ठींना मोठी कसरत करावी लागणार आहे. ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली असली तरी नाराज झालेले उमेदवार बंडखोरी करणार नाहीत याची काळजी सत्ताधारी एकता पॅनल घेत आहेत.  उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी शेवटचे दोन दिवस शिल्लक असल्यामुळे या संदर्भातील हालचाली अधिक गतिमान झाल्या असून, प्रत्येक पॅनलप्रमुख प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे.  उद्योग विकास पॅनेलने सिन्नरपासून प्रचाराला सुरुवात केली आहे. ज्येष्ठ उद्योजक रमेश नवले यांच्या हस्ते प्रचाराचा नारळ वाढविण्यात आला. यावेळी तुषार चव्हाण, प्रदीप पेशकार, शशिकांत जाधव, संजय महाजन, टी. एन. अग्रवाल, नामकर्ण आवारे, नारायण वाजे, एम. जी. कुलकर्णी, किरण वाजे, नितीन गायधनी आदींसह उमेदवार उपस्थित होते.

टॅग्स :Electionनिवडणूक