शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

बंड्या मुर्तडकला दोन दिवसांची पोलीस कोठडी

By admin | Updated: June 2, 2017 01:53 IST

निकम या युवकाच्या खूनप्रकरणी पोलिसांनी अटक केलेला संशयित बंड्या मुर्तडकला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : पंचवटीमधील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या किरण निकम या युवकाच्या खूनप्रकरणी पोलिसांनी अटक केलेला संशयित बंड्या मुर्तडकला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.पंचवटीमधील नवनाथनगर परिसरात मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास धारधार शस्त्राने हल्ला चढवून हल्लेखोरांनी निकमची हत्या केली होती. या हत्त्येचा बदला घेण्यासाठी निकम याचा भाऊ संशयित शेखर निकम याने या खुनातील संशयित बंड्या मुर्तडकच्या हत्येचा कट रचला होता. या कटामध्ये मात्र मुर्तडकच्या चेहऱ्याशी साम्य असलेला व उपनगर-जेलरोड परिसरातील मंगलमूर्तीनगरमध्ये एका कुटुंबाकडे कसारा येथून पाहुणा आलेल्या तुषार साबळे या विद्यार्थ्याची हत्या टोळक्याने केल्याचे पोलीस तपासात पुढे आले होते. एकूणच निकम खूनप्रकरणाशी साबळेच्या हत्येचे धागेदोरे जुळल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, पोलिसांनी मुर्तडक यास काही दिवसांपूर्वी अटक केली; मात्र गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला सराईत संशयित शेखर हा अद्याप पोलिसांच्या हाती लागला नसून त्याला अटक करण्याचे मोठे आव्हान उपनगर व पंचवटी पोलिसांपुढे आहे. निकम खुनातील संशयित आरोपी मुर्तडक यास गुरुवारी (दि.१) जिल्हा न्यायालयात पोलिसांनी हजर केले असता त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.