शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

दोघा नगरसेवकांचा राजीनामा

By admin | Updated: February 1, 2017 00:42 IST

कारवाईचा धसका : पक्षबदलू ४३ नगसेवकांवर टांगती तलवार

नाशिक : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर केलेले कॉँग्रेसचे नगरसेवक शिवाजी गांगुर्डे आणि मनसेचे नगरसेवक शशिकांत जाधव यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्याकडे सुपूर्द केला. निवडणुकीत पुन्हा निवडून गेल्यास कायदेशीर प्रक्रियेत अडकू नये याची खबरदारी घेत दोघा नगरसेवकांनी राजीनामा दिला आहे. उर्वरित ३९ पक्षबदलू नगरसेवकांवरही भविष्यात संबंधित राजकीय पक्षांकडून कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने त्यांच्याकडूनही राजीनाम्यासाठी आयुक्तांकडे परेड होण्याची शक्यता आहे. चालू पंचवार्षिक काळात आतापर्यंत ४८ नगरसेवकांनी पक्षांतर केलेले आहे. त्याची सुरुवात लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी झाली. सर्वांत प्रथम मनसेच्या तिकिटावर निवडून गेलेले हेमंत गोडसे यांनी पक्षांतर करत शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर, जनराज्यचे  अपूर्व हिरे हे भाजपात तर त्यांच्याच पक्षाच्या शोभा निकम यांनी शिवसेनेची वाट धरली. मनसेचे नीलेश शेलार व शोभना शिंदे यांनी पक्षादेशाचे उल्लंघन करत सेनेला मदत केली. त्यामुळे त्यांना नंतर नगरसेवकपद गमवावे लागले.  गेल्या सात - आठ महिन्यांत महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तब्बल ४२ नगरसेवकांनी पक्षांतर केलेले आहे. या सर्वच नगरसेवकांनी नव्या घरात प्रवेश करण्यापूर्वी पुन्हा उमेदवारी मिळण्यासाठी दावा केलेला आहे. त्यातील काही नगरसेवकांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. आता नामनिर्देशनपत्र दाखल केले जात असून, प्रवेश केलेल्या पक्षाकडून उमेदवारी दाखल केल्यास अथवा निवडून आल्यानंतर भविष्यात पक्षांतर बंदीच्या कायद्याच्या कचाट्यात आपण अडकू नये, याची खबरदारी घेत मंगळवारी (दि. ३१) कॉँग्रेसमधून भाजपात गेलेले नगरसेवक शिवाजी गांगुर्डे आणि मनसेतून भाजपात गेलेले नगरसेवक शशिकांत जाधव यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला आहे. आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्याकडे या दोहोंनी आपले राजीनामापत्र सुपूर्द केले. दोहोंनी अगोदर टपालाने राजीनामा पत्र पाठविले होते, परंतु राजीनामापत्र हे प्रत्यक्ष सादर करावे लागत असल्याने आयुक्तांनी त्यांना पाचारण करत ओळखपरेड करून घेतली. (प्रतिनिधी)कशी होऊ शकते कारवाई?विद्यमान नगरसेवकांची मुदत ही १५ मार्चपर्यंत आहे. पक्षांतर केलेल्या नगरसेवकांनी प्रवेश केलेल्या  पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आणि ते पुन्हा निवडून आले तर नवीन महापौरपदाच्या निवडणुकीपूर्वी त्यांच्याविरुद्ध संबंधित पक्षांकडून पक्षांतरबंदी कायद्यान्वये विभागीय आयुक्तांकडे तक्रार नोंदविली जाऊ शकते. त्यामुळे पक्षांतरबंदी  कायद्याच्या कचाट्यात अडकून होणाऱ्या कारवाईला सामोरे जावे लागेल.  परिणामी भविष्यात नगरसेवकपदावरही गंडांतर येऊ शकते. त्यामुळेच खबरदारी म्हणून गांगुर्डे व जाधव यांना सुचलेले शहाणपण अन्य पक्षबदलूंना येण्याची शक्यता आहे.