पंचवटी : दिंडोरी रोडवरील तारवालानगर चौफुलीवर स्विफ्ट कार व होंडा जझ या दोन चारचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात आडगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी गणेश रोकडे हे जखमी झाले आहेत. सोमवारी मध्यरात्री हा अपघात घडला. पंचवटी पोलीस ठाण्यात सदर अपघाताची नोंद करण्यात आली आहे. याबाबत माहिती अशी की, आडगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी गणेश रोकडे हे रविवारी रात्रीच्या सुमाराला ड्यूटी आटोपून रात्री एक वाजेच्या सुमाराला घराकडे जात असताना दिंडोरी रोडवरील तारवालानगर चौफुलीवर समोरून येणाऱ्या स्विफ्ट कारने (एमएच १५, बीएक्स ६९९७), लिंकरोडला जाणाऱ्या होंडा जझ कारला (एमएच १५, इएक्स ३७८०) धडक दिली. या धडकेने होंडा कार उलटली. यात रोकडे यांना गंभीर मार लागल्याने त्यांना वोक्हार्ट रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातप्रकरणी स्विफ्ट कारचालक विजय दलवटे याच्याविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. (वार्ताहर)
दोन कार धडकल्या
By admin | Updated: July 26, 2016 00:40 IST