शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

चार दिवसांत सापडल्या दोन बौद्धकालीन लेणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:15 IST

कोरोनाकाळातही अनेक स्थानिक हौशी गिर्यारोहक या डोंगरावर फिरायला जातात. मात्र, काही अभ्यासू लोक काही विशेष माहितीच्या शोधात फिरत असतात. ...

कोरोनाकाळातही अनेक स्थानिक हौशी गिर्यारोहक या डोंगरावर फिरायला जातात. मात्र, काही अभ्यासू लोक काही विशेष माहितीच्या शोधात फिरत असतात. अशाच पुरातत्त्व अभ्यासकांनी या लेणींचा शोध लावला. चारच दिवसांपूर्वी सापडलेल्या दोन भिक्खू निवासगृहांनंतर मंगळवारी त्रिरश्मी लेणीवर आणखीन एक प्राचीन भिक्खू निवासगृह सापडले आहे. त्यामुळे नाशिकमध्ये एकेकाळी बौद्ध धम्माचे मोठे प्रस्थ होते, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.

नाशिकचे वरिष्ठ पुरातत्त्व संरक्षक सहायक राकेश शेंडे, अतुल भोसेकर, पुरातत्त्वविद मैत्रेयी भोसेकर, लिपीतज्ज्ञ सुनील खरे, वरिष्ठ कर्मचारी सलीम पटेल आणि साक्षी भोसेकर यांचा चमू मंगळवारी सकाळी त्रिरश्मी डोंगरावर सर्वेक्षण करीत असताना एका कपारीत झाडाझुडपांमध्ये अपूर्ण लेणी दिसली. या अपूर्ण अवस्थेतील भिक्खू निवासगृहाच्या संरचनेवरून व पुरातत्त्वीय अभ्यास केल्यानंतर या लेणीचा कोरण्याचा काळ इ.स.पूर्व २०० ते २५० असू शकतो, असे ट्रिबिल्सचे अध्यक्ष अतुल भोसेकर यांनी म्हटले आहे. यामुळे एकंदरीतच महाराष्ट्रातील आणि भारतातील सर्व बुद्ध लेणींच्या कालमापनाच्या तारखेत बदल होऊ शकतो, असे ते म्हणाले.

आजपर्यंत नाशिकची जगप्रसिद्ध त्रिरश्मी बुद्ध लेणी समूहाचा काळ इ.स.पूर्व २०० ते इ.स.६०० समजला जात होता. परवाच्या दोन भिक्खू निवासगृहे आणि आताच सापडलेल्या अपूर्ण भिक्खू निवासगृहाचा काळ इ.स.पूर्व २०० ते इ.स.पूर्व २५० असावा, असे पुरातत्त्वीय प्रमाणांवरून दिसते. म्हणजेच येथील लेणी २२७० वर्षे जुन्या आहेत. त्यामुळे नाशिकच्या त्रिरश्मी बुद्ध लेणींचे कालमापन अजून प्राचीन झाले आहे. पुरातत्त्वविद मैत्रेयी भोसेकर या लेणींचे दस्तऐवजीकरण करीत असून लवकरच ते भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणला सादर केले जाणार आहे. येत्या २५६५व्या बुद्ध पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला सापडलेल्या या नवीन बुद्ध लेणींमुळे इतिहासप्रेमी, पुरातत्त्वविद आणि लेणी संवर्धकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

-

-कोट-- त्रिरश्मी लेणींच्या वरच्या थरावर तीन नवीन लेणी शोधून काढल्या आहेत. लेणींचे निश्चितपणे जतन व संवर्धन केले जाईल, तसेच रेखांकन व दस्तऐवजीकरण केले जाईल आणि लवकरच पाथवे व रेलिंगचे कामही केले जाईल. अस्तित्वात असलेल्या लेणींच्या थराशिवाय आणखी काही गुहा अस्तित्वात असण्याची शक्यता आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागातर्फे संयुक्तरीत्या सर्वेक्षण केले जाईल.

-राकेश शेंडे (वरिष्ठ संरक्षक सहायक, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण)

-

कोट--

लेणीवर सापडलेले भिक्खू निवासगृह हे निश्चितच त्रिरश्मी बुद्ध लेणी समूहापेक्षा प्राचीन आहे आणि लेणी कोरण्याची प्राथमिक अवस्था दर्शविते. ही लेणी २२०० वर्षे किंवा त्यापेक्षाही जुनी असावी. यामुळे संशोधकांना लेणी बनविण्याच्या पद्धतीचा अभ्यास करता येईल.

-मैत्रेयी भोसेकर (पुरातत्त्वविद आणि लिपीतज्ज्ञ) (फोटो: आर)

===Photopath===

250521\412525nsk_46_25052021_13.jpg

===Caption===

चार दिवसात सापडल्या दोन बौद्धकालीन लेणी