नाशिक : पंचवटीतील नाग चौकात गावठी कट्टा विक्रीसाठी आलेल्या दोघा संशयितांना शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने शनिवारी (दि़१०) अटक केली़ या दोघांकडून गावठी कट्टा जप्त करण्यात आला असून, संशयितांमध्ये एका विधिसंघर्षित बालकाचाही समावेश आहे़ गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस कॉन्स्टेबल शंकर गडदे यांना नाग चौकात गावठी कट्टा विक्रीसाठी दोघे जण येणार असल्याची माहिती मिळाली होती़ ्त्यानुसार सापळा रचून संशयित चेतन रवींद्र इंगोले (१९, रा़ तारवालानगर, तलाठी कॉलनी) व पंचवटीतील अमरधाम परिसरातील एका विधिसंघर्षित बालकास ताब्यात घेतले़ या दोघांकडून ३० हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा जप्त केला आहे़ सहायक पोलीस निरीक्षक दीपक गिरमे, चंद्रकांत पळशीकर, पोलीस कॉन्स्टेबल विशाल देवरे, विजय टेमगर, नीलेश काटकर, विशाल काठे, स्वप्नील जुंदे्र, संदीप भुरे, गणेश वडजे, शरद सोनवणे यांनी ही कामगिरी केली़ (प्रतिनिधी)
गावठी कट्टा विक्री करणाऱ्या दोघांना अटक
By admin | Updated: September 11, 2016 02:13 IST