शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

रंगेहात ताब्यात : ट्रकचालकाला लुटून पळणाऱ्या चोरट्यांना ठोकल्या बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 15:02 IST

पोलिसांची गाडी जवळ येत असल्याचे बघून या दोघांनी पळण्यास सुरूवात केली. यावेळी पथकातील कर्मचाऱ्यांनी ट्रकचालकाकडे विचारणा केली असता त्याने पैसे घेऊन मारहाण करून दोघे पळून गेल्याचे सांगितले.

नाशिक : येथील उड्डाणपूलावरून मार्गस्थ होणारा एक ट्रक अडवून त्या ट्रकचालकाला दमदाटी करत बळजबरीने त्याच्याजवळील पाकिटमधील रक्कम काढून घेत पोबारा करणाऱ्या भुरट्या चोरट्यांना पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने तत्काळ बेड्या ठोकल्या.याबाबत अधिक माहिती अशी, पंचवटी पोलीस ठाणेचे गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक सत्यवान पवार, सहाय्यक उपनिरीक्षक संजय वानखेडे, हवालदार सुरेश नरवडे, महेश साळुंके आदि इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीतून गुन्ह्याचा तपास करून पंचवटीकडे उड्डाणूपूलावरून परतत होते. यावेळी उड्डाणपूलावर दोघे इसम एका ट्रकचालकाला दमदाटी करत मारहाण करण्याचा प्रयत्नात असल्याचे दिसले. पोलिसांची गाडी जवळ येत असल्याचे बघून या दोघांनी पळण्यास सुरूवात केली. यावेळी पथकातील कर्मचाऱ्यांनी ट्रकचालकाकडे विचारणा केली असता त्याने पैसे घेऊन मारहाण करून दोघे पळून गेल्याचे सांगितले. पथकाने क्षणाचाही विलंब न करता वाहनातून त्यांचा पाठलाग करत ताब्यात घेतले. संशयित उमेश गणेश भुजबळ (रा.माणिकनगर, सिडको), राहूल नारायण जाधव (रा.अमृतधाम) अशी दोघा लूटारूंची नावे आहेत.त्यानंतर पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता त्यांनी चालकाचे बळजबरीने हिसकावलेले साडे तीनशे रूपये आढळून आले. याबाबत दोघांवर जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयRobberyचोरीArrestअटक