शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

दरोड्‌याच्या तयारीतील दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:15 IST

पोलिसांनी संशयित आरोपी अंकुश संजय आरोटे (२२) व नीलेश दिगंबर दांडकेर (२१, दोन्ही रा. लक्ष्मी हाॅटेलजवळ, जिपीएफ कॉलनी, वाळूंज ...

पोलिसांनी संशयित आरोपी अंकुश संजय आरोटे (२२) व नीलेश दिगंबर दांडकेर (२१, दोन्ही रा. लक्ष्मी हाॅटेलजवळ, जिपीएफ कॉलनी, वाळूंज एमआयडीसी, विटवा जि. औरंगाबाद) यांना अटक केली असून तिसरा साथीदार श्रावण सुरेश पिंगळे (रा. ता. दिंडोरी, ता. निफाड) व त्याचे इतर दोन साथीदार हे फरार झाले आहेत. पोलिसांनी संशयितांकडून दरोडा टाकण्याचे साहित्य जप्त केले आहे. --------------------------------------------

खड्डयात पडून एकाचा मृत्यू

नांदगाव : मालेगाव-नांदगाव रोडवर हॉटेल निसर्गसमोर खड्डयाचा अंदाज न आल्याने मोटारसायकल खड्डयात पडून सोपान निंबा बोरसे (३०, रा. हिरेनगर, नांदगाव) हा गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. सोपान बोरसे हा मोटारसायकल (क्रमांक एमएच १५ बीएफ ३२) यावरून नागासाक्या येथून नांदगाव येथे येत असताना रात्री ८.३०च्या सुमारास हॉटेल निसर्गसमोर रस्त्याच्या शेजारी असलेल्या खड्डयाचा अंदाज न आल्याने त्यात पडून तो गंभीर जखमी झाला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे.

---------------------------------------------

एसटी बसच्या धडकेत महिला जखमी

देवळा : उमराणे ता. देवळा येथे मुंबई-आग्रा रोडवर रस्ता ओलांडणारी महिला एसटी बसने दिलेल्या धडकेत जखमी झाली आहे. दिनेश रघुनाथ देसले (रा. माडीच, ता. शिंदखेडा जि. धुळे) या एसटी चालकाने (क्रमांक एमएच२० बीएल३४१४) गाडी निष्काळजीपणे चालवत रस्ता ओलांडणाऱ्या आशा रमेश सोलंकी (८, रा. कुंडीया, पो. मालवन, जि. बडवाणी, मध्य प्रदेश) या बालिकेला धडक दिली. त्यात ही बालिका गंभीर जखमी झाली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

--------------------------------------------

चिंचावडला वीज कर्मचाऱ्यास मारहाण

मालेगाव : चिंचावड (ता. मालेगाव) येथे घराचा वीज पुरवठा खंडित का केला व इलेक्ट्रिक मीटर का काढून घेतले, असा जाब विचारत वीज कर्मचाऱ्याला धक्काबुक्की व मारहाण केल्याप्रकरणी संशयित आकाश बापू भदाणे (रा. चिंचावड, ता. मालेगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वीज कर्मचारी राहुल अभिमन खरे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली असून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

--------------------------------------

एसटी बसच्या धडकेत एक ठार

नांदगाव : नांदगाव-औरंगाबाद रोडवर पोखरी शिवारात एसटीने मोटारसायकलस्वारास धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. एसटी बस (क्रमांक एमएच ०७ सी ९३३८) ही कन्नड-औरंगाबाद रोडने येत असताना चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवत मोटारसायकलस्वार किरण बाबासाहेब चव्हाण (२५, रा. मुंगसापूर, ता. कन्नड, जि. औरंगाबाद) यास धडक दिली. त्यात त्याच्या डोक्याला गंभीर मार लागून त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी एसटी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.