शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

अडीच हजार विद्यार्थ्यांनी मारली दांडी राज्यसेवा परीक्षा : दोन परीक्षा केंद्रांमध्ये ऐनवेळी बदल; काहीसा गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 01:24 IST

नाशिक : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे रविवारी (दि.८)घेण्यात आलेल्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेस अडीच हजारांहून अधिक उमेदवारांनी दांडी मारली.

ठळक मुद्देपरीक्षेच्या दोन परीक्षा केंद्रांमध्ये ऐनवेळी बदल दोन हजार ५२६ उमेदवार गैरहजर

नाशिक : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे रविवारी (दि.८)घेण्यात आलेल्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेस अडीच हजारांहून अधिक उमेदवारांनी दांडी मारली. यात सकाळच्या सत्रात दोन हजार ५२६, तर दुपारच्या सत्रातील दोन हजार ५७० गैरहजर राहिले, तर सुमारे ८ हजार ३०० विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. पूर्वनियोजित परीक्षा केंद्रांपैकी राज्य सेवा (पूर्व) परीक्षेच्या दोन परीक्षा केंद्रांमध्ये ऐनवेळी बदल करण्यात आला होता. त्यातच शहरात राज्यसेवा परीक्षा व बारावीच्या विद्यार्थ्यांचा जेईई मेन या दोन्ही परीक्षा एकाच वेळी आल्याने परीक्षा केंद्राविषयी उमेदवारांमध्ये काहीकाळ संभ्रमावस्था निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले. राज्यसेवा परीक्षेसाठी उपकेंद्र क्र मांक २ के. के. वाघ इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर, येथील विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था के. के. वाघ इन्स्टिट्यूट आॅफ पॉलिटेक्निकच्या इमारतीत करण्यात आली होती. राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी दोन सत्रातील राज्यसेवा पूर्वपरीक्षेस सकाळच्या पहिल्या सत्रात ८ हजार ३०६ परीक्षार्थींपैकी दोन हजार ५२६ उमेदवार गैरहजर होते, तर दुपारच्या सत्रात दोन हजार ५७० परीक्षार्थी गैरहजर राहिले. शहरातील एकूण २८ परीक्षा केंद्रांवर ७३५ केंद्र निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली होती. या सर्व केंद्रांवर परीक्षा सुरळीत पार पडल्याची माहिती परीक्षा नियंत्रक विभागाकडून देण्यात आली.