शहरं
Join us  
Trending Stories
1
'व्हायरल व्हिडीओ बनावट,मी गाडीत नव्हतो'; महामार्गावर कांड करणाऱ्या नेत्याने काय सांगितले?
2
संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरी धाड, ५० लाखांचं सोनं, मोठं घबाड सापडलं
3
२९ पैकी १५ जखमा ताज्या; मारहाण करून वैष्णवीची हत्या केली, कसून चौकशी करा, कस्पटेंची मागणी
4
'अब की बार ९००० पार!' टी-२० क्रिकेट जगतात असा पराक्रम करणारा कोहली पहिला फलंदाज
5
...अन् रिषभ पंतनं कोलांटी उडी मारत व्यक्त केला शतकी खेळीचा आनंद (VIDEO)
6
अशोक सराफ यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरव, म्हणाले- "माझ्या जीवनातील विशेष क्षण..."
7
शेतजमीन वाटणीपत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफ; वाचा मंत्रिमंडळाचे दहा महत्वाचे निर्णय
8
महाराष्ट्रातील 'या' भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
9
Jyoti Malhotra: थेट आयएसआय एजंटसोबतच संपर्क! ज्योती मल्होत्राचे 'ते' चार मित्र कोण? 12 टीबी डेटा पोलिसांच्या हाती
10
धक्कादायक! त्याला वाटलं अ‍ॅसिडिटी झालीये, पण..., १३ वर्षांच्या विद्यार्थ्याचा गुजरातमध्ये मृत्यू
11
आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या कधीपर्यंत रिटर्न भरता येणार?
12
हेल्पलाईन नंबर सकाळी 9.45 ते सायंकाळी 06.15 या कार्यालयीन वेळेत सुरु; महिला आयोगाचे स्पष्टीकरण
13
लातुरमध्ये दोन तास धो-धो पाऊस, दुचाकी वाहिल्या तर चारचाकी तरंगल्या; घरांमध्ये पाणी शिरले
14
निर्णय मागे घ्या, नाहीतर अणुबॉम्ब टाकेन; किम जोंग उनची अमेरिकेला थेट धमकी! कारण काय?
15
Shalarth ID Ghotala: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे पुनर्मुल्यांकनाचे काम रखडणार, नवी गुणपत्रिका कोण बनविणार?
16
Yuzvendra Chahal Shashank Singh, IPL 2025: "पंजाब किंग्जसाठी युजवेंद्र चहल आणि टीम बसचा ड्रायव्हर एकसमान"; शशांक सिंगचे विधान व्हायरल
17
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! उद्यापासून २४ तास 'या' भागातील पाणीपुरवठा राहणार बंद
18
'ती गुन्हेगार नाही...', भारत-पाक तणावावेळी वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या तरुणीला केली होती अटक, हायकोर्टाने फटकारले
19
India Bangladesh Border Tensions: बांगलादेश सरकारचे सल्लागार जहांगीर यांनी वाढवलं युनूस यांचं 'टेन्शन'; भारताविरूद्ध ओकली गरळ

जिल्हा रुग्णालयात रुग्णाचा अडीच तास धुमाकूळ

By admin | Updated: January 31, 2017 01:04 IST

पुरुष वार्डात तोडफोड : हातात रॉड घेऊन पसरविली दहशत; पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर घेतले ताब्यात

नाशिक : विषारी औषध प्राशन केल्याने मानसिक संतुलन बिघडलेल्या तरुणाने सोमवारी (दि़३०) जिल्हा रुग्णालयात सुमारे अडीच तास अक्षरश: धुमाकूळ घातला़ सलाइन लावलेल्या लोखंडी रॉडने त्याने तोडफोड सुरू केल्याने परिचारिका व रुग्णांची धावपळ उडाली. सरकारवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक, सात ते आठ कर्मचारी व स्ट्रायकिंग फोर्सच्या जवानांनी वार्डातील उपचार घेत असलेल्या रुग्णांना इजा न होऊ देता वार्डाबाहेर काढले.  त्यानंतर गोंधळ घालणाऱ्या तरुणास शिताफीने ताब्यात घेतले़  सातपूरच्या अशोकनगर परिसरातील मद्यपी तरुणाने शनिवारी (दि़२८) रात्रीच्या सुमारास विषारी औषध प्राशन केल्याने त्यास कुटुंबीयांनी उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते़ मद्याची सवय असलेल्या या तरुणाने नशेतच विषारी औषध प्राशन केल्याची माहिती परिचारिकांनी दिली़ गत दोन दिवसांपासून उपचार सुरू असलेल्या व प्रकृती स्थिर झाल्याने या तरुणास तिसऱ्या मजल्यावरील पुरुषवार्डात हलविण्यात आले होते़  मद्याची सवय जडलेल्या या तरुणास मद्य न मिळाल्याने सोमवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास त्याचे मानसिक संतुलन बिघडले़ त्याने हातास लावलेले सलाइन काढून घेत सलाइन रॉड घेऊन गोंधळ घालण्यास सुरुवात केली़ अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिचारिकांसह या वार्डातील इतर रुग्णही घाबरून सैरावैरा पळायला लागले़ या रुग्णास शांत करण्यासाठी गेलेल्या रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांवर तो धाऊन जात होता तर काहींना त्याच्या रॉडचा मारही खावा लागला़ या घटनेची माहिती तत्काळ सरकारवाडा पोलिसांना देण्यात आली़सरकारवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सागर चव्हाण, पोलीस हवालदार शिंदे, पोलीस शिपाई बगाडे यांच्यासह सात ते आठ कर्मचारी जिल्हा रुग्णालयात दाखल झाले़ तोपर्यंत तिसऱ्या मजल्यावरील पुरुष कक्षात या युवकाने रॉडने औषधांच्या बाटल्यांची तोडफोड केलेली होती़ त्यास पकडण्यासाठी गेले असता तो रॉड घेऊन अंगावर धाऊन जात होता़ पोलिसांनी मोठ्या चातुर्याने या कक्षातील रुग्णांना ऐकेक करीत बाहेर काढून या कक्षाची जाळी लावून घेतली़ यानंतर स्ट्रायकिंग फोर्सलाही बोलविण्यात आले होते़