शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बावीस मिनिटानंतर चंद्रावर पडणार पृथ्वीची सावली: खंडग्रास चंद्रग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 23:11 IST

सोमवारी (दि.७) रात्री १० वाजून ५२ मिनिटाला सूर्य, पृथ्वी आणि चंद्र हे तीनही ग्रह एका सरळ रेषेत येणार आहेत. त्यामुळे दोन वर्षापुर्वी एप्रिलमध्ये घडलेल्या खंडग्रास चंद्रग्रहणाची पुनरावृत्ती होऊन पृथ्वीच्या सावलीखाली निम्मा चंद्र पुन्हा झाकला जाऊन खंडग्रास चंद्रग्रहण संपूर्ण देशभरात घडणार आहे.

- अझहर शेख

नाशिक, दि. 7 - सोमवारी (दि.७) रात्री १० वाजून ५२ मिनिटाला सूर्य, पृथ्वी आणि चंद्र हे तीनही ग्रह एका सरळ रेषेत येणार आहेत. त्यामुळे दोन वर्षापुर्वी एप्रिलमध्ये घडलेल्या खंडग्रास चंद्रग्रहणाची पुनरावृत्ती होऊन पृथ्वीच्या सावलीखाली निम्मा चंद्र पुन्हा झाकला जाऊन खंडग्रास चंद्रग्रहण संपूर्ण देशभरात घडणार आहे.खगोलप्रेमींसाठी औत्सुक्याची आणि आवडीची बाब असलेला खंडग्रास चंद्रग्रहण यापूर्वी ४एप्रिल २०१५ साली ईशान्य भारतातून बघावयास मिळाला होता. त्यानंतर सोमवारी रात्री १० वाजून ५२ मिनिटाला पृथ्वीची सावली हळूहळू चंद्रावर पडण्यास सुरूवात होणार आहे. सूर्य, पृथ्वी आणि चंद्र हे तीनही ग्रह एका सरळ रेषेत येऊन चंद्रग्रहण बघावयास मिळणार आहे. हे खंडग्रास प्रकारचे ग्रहण आहे. चंद्रग्रहणाला वेधआरंभ दुपारी १२वाजून ४४ मिनिटाला झाला. या ग्रहणाचा चंद्राला स्पर्श १० वाजून ५२ मिनिटाला होऊन रात्री १२ वाजून ४४ मिनिटाला मोक्ष अर्थात पृथ्वीच्या सावलीतून चंद्राची सुटका होईल. ग्रहणाचा हा संपूर्ण कालावधीचा पर्व १ तास ५७ मिनिटाचा राहणार आहे. जवळपास दोन तास खंडग्रास चंद्रग्रहण देशभरात पहावयास मिळेल.नाशिक शहर व परिसरासह राज्याच्या विविध शहरांमध्ये रात्रीच्या सुमारास ढगाळ हवामान व काही भागात रिमझिम पाऊस होत असल्यामुळे नागरिकांना चंद्रग्रहण कितपत बघता येईल, याची शाश्वती नाही.

काय आहे ‘खंडग्रास’ चंद्रग्रहणसूर्य-पृथ्वी-चंद्र हे जेव्हा एका सरळ रेषेत येतात तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडते आणि त्यामुळे चंद्राचा प्रकाशमान भाग काही प्रमाणात झाकला जातो. परिणामी आपल्याला चंद्र काही अंश प्रकाशमान दिसतो आणि काही अंशी चंद्रावर अंधार पडल्याचे जाणवते. या अवस्थेला खगोलीय भाषेत ‘खंडग्रास’ चंद्रग्रहण असे म्हणतात. तसेच अंशिक चंद्रग्रहण असाही शब्दप्रयोग केला जातो. याउलट स्थिती म्हणजे पृथ्वीची पूर्ण सावली चंद्रावर जेव्हा येते तेव्हा खग्रास चंद्रग्रहण होतो.

निव्वळ अंधश्रद्धाच...चंद्रग्रहण असो किंवा सूर्यग्रहण असो त्या कालावधीत कुठल्याही प्रकारे अन्नपदार्थ दूषित होत नाहीत किंवा त्यामध्ये जंतुंची वाढदेखील होत नाहीत. बुवाबाजी करणा-यांनी चंद्र व सूर्यग्रहणासंदर्भात विविध अंधश्रद्धा समाजात पसरविल्या असून, त्याला वैज्ञानिकदृ्या व प्रयोगाअंती कोणताही आधार नसल्याचे सिद्ध झाले आहे.

- किरणकुमार जोहरे, भौतिकशास्त्रज्ञ