नाशिक : एका गहाळ झालेल्या एटीएम कार्डचा वापर करत भामट्याने एटीएममधून वीस हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी टाकळीरोडवर राहणाऱ्या अंकुश सतीशकुमार मध्यन यांचे एटीएम कार्ड काही दिवसांपूर्वी गहाळ झाले होते. या एटीएमचा वापर करून एका भामट्याने काठे गल्लीमधील स्टेट बॅँकेच्या एटीएममधून वीस हजार रुपये काढून घेतल्याचे अंकुश यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात जाऊन भामट्याविरुद्ध तक्रार दिली आहे. (प्रतिनिधी)
गहाळ एटीएम कार्डद्वारे वीस हजार लांबविले
By admin | Updated: July 15, 2016 00:16 IST