शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

प्रभाग १७ साठी बारा, तर ६१ साठी चौदा अर्ज

By admin | Updated: June 11, 2014 01:07 IST

प्रभाग क्रमांक १७ मधील काँग्रेसचे नगरसेवक दिनकर पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत बसपाकडून उमेदवारी केल्याने त्यांना नगरसेवकपदाचा राजीनामा द्यावा लागल्याने या रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात येत आहे.

 

सातपूर : येथील प्रभाग क्रमांक १७ मधील पोटनिवडणुकीत आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी महायुतीकडून माजी नगरसेवक दिनकर पाटील (भाजपा), तर आघाडीकडून माजी नगरसेवक सदाशिव माळी (काँग्रेस) यांच्यासह तिघा अपक्ष उमेदवारांनी १२ अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केले.प्रभाग क्रमांक १७ मधील काँग्रेसचे नगरसेवक दिनकर पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत बसपाकडून उमेदवारी केल्याने त्यांना नगरसेवकपदाचा राजीनामा द्यावा लागल्याने या रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. दिनकर पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्याने भाजपाने त्यांना या पोटनिवडणुकीत उमेदवारी बहाल केली आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी दिनकर पाटील यांच्यासमवेत भाजपाचे शहर अध्यक्ष लक्ष्मण सावजी, उपमहापौर सतीश कुलकर्णी, विजय साने, गोपाळ पाटील, सुरेश पाटील, प्रा. देवयानी फरांदे, नाना शिलेदार, जगन पाटील, सातपूर मंडल अध्यक्ष संजय राऊत, शिक्षण मंडळ सदस्य रामहरी संभेराव, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख अजय बोरस्ते, सुधाकर बडगुजर, रिपाइंचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश लोंढे यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.आघाडीच्या वतीने काँग्रेस पक्षाची उमेदवारी घेऊन राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक सदाशिव माळी यांनी आपला अर्ज दाखल केला. यावेळी नाना महाले, अश्विनी बोरस्ते, शोभा बच्छाव, योगिता अहेर, कविता कर्डक, शमीना मेमन, हेमलता पाटील, शोभा मगर, लक्ष्मण जायभावे, बाळासाहेब जाधव, भिवानंद काळे आदिंसह आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचप्रमाणे साहेबराव जाधव, कोळप्पा धोत्रे, सुनील शेंद्रे या उमेदवारांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले आहेत. (वार्ताहर)