शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

बारा तासांत बारा मि.मी. पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2016 00:04 IST

उघडिपीकडे वाटचाल : दोन दिवसांत झपाट्याने घटले प्रमाण

नाशिक : गेल्या रविवारी बारा तासांत १४० मिलिमीटरपर्यंत झालेल्या विक्रमी पावसाचे प्रमाण आता सातत्याने घटत चालले असून, शहरात मंगळवारी (दि.१२) बारा तासांत केवळ १२ मि.मी. पाऊस झाल्याची नोंद हवामान खात्याने केली आहे.सोमवारी (दि.११) पहाटेपासून पावसाची संततधार सुरू होती; मात्र दुपारनंतर पावसाने उघडीप दिल्याने बारा तासांमध्ये केवळ १५.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मंगळवारी पावसाचे प्रमाण यापेक्षाही अधिक घटले आणि शहरात केवळ १२ मि.मी. पाऊस झाला. एकूणच उशिराने बरसलेला वरुणराजा पुन्हा रुसतो की काय, अशी चिंता व्यक्त केली जात आहे. धरणसाठ्यात वाढ झाल्याने महापालिकेने आनंदात लोकप्रियतेसाठी एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय मागे घेतला आहे; मात्र पावसाचे घटत चालले प्रमाण चिंताजनक असून, पावसाने ओढ दिल्यास धरणाचा जलसाठा खालावण्याची शक्यता नाकारता येत नाही. सोमवारपासून शहरासह धरणक्षेत्रातही पावसाचे प्रमाण गेल्या शनिवार, रविवारच्या तुलनेत कमी झाल्याचे जलसंपदा विभागाच्या आकडेवारीवरून सहज स्पष्ट होते. मंगळवारी धरण क्षेत्रात बारा तासांमध्ये केवळ वीस मि.मी. पाऊस झाल्याची नोंद आहे. एकूणच वरुणराजा पुन्हा नाशिककरांवर रुसतो की काय, असे चिन्हे आकडेवारीवरून दिसत आहे. मात्र लहरी निसर्ग कधीही आपले रूप बदलू शकतो. सध्यातरी पावसाची उघडिपीकडे वाटचाल सुरू असल्याचे दिसत आहे. (प्रतिनिधी)