शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पहिनेच्या जंगलात बारा तास आगीचे तांडव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:14 IST

मार्च महिन्याला प्रारंभ झाल्याने उन्हाच्या झळा अतितीव्र स्वरूपात जाणवू लागल्या आहे. शहरासह जिल्ह्यातील पारा वेगाने वाढत असल्यामुळे जंगलातील रानगवत ...

मार्च महिन्याला प्रारंभ झाल्याने उन्हाच्या झळा अतितीव्र स्वरूपात जाणवू लागल्या आहे. शहरासह जिल्ह्यातील पारा वेगाने वाढत असल्यामुळे जंगलातील रानगवत वाळून एखाद्या ज्वलनशील पदार्थांइतकेच घातक झाले आहे. यामुळे या गवताचा ज्वलनशील घटकांशी संबंध येताच कृत्रिम वणवे त्र्यंबकेश्वर वनपरिक्षेत्रात मागील आठवडाभरापासून भडकत आहे. पहिने गावाचा परिसर निसर्गरम्य असून, पावसाळ्यासह बारामाही हा भाग शहरी नागरिकांना आकर्षित करत असतो. येथील डोंगररांगा व राखीव वनांमध्ये भटकंतीसाठी तरुणाई जात असते. शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास पहिनेजवळी राखीव वनाभोवती महाविद्यालयीन दोघा तरुणांनी धूम्रपान करत दाखविलेल्या निष्काळजीपणामुळे मोठी आग भडकली. पहिनेच्या ३५३ गटात भडकलेल्या या मानवनिर्मित वणव्यामध्ये सुमारे दोन वर्षे वाढ झालेली हजारो रोपे होरपळून राख झाली. वाळलेले गवत आणि पाळापाचोळा वेगाने पेटू लागल्यामुळे क्षणार्धात आगीने राैद्रावतार धारण केला. घटनेची माहिती मिळताच आजूबाजूच्या लोकांनी धाव घेत, त्र्यंबकेश्वर वन कर्मचाऱ्यांना माहिती कळविली. माहिती मिळताच पारंपरिक पद्धतीने आग विझविण्यासाठी नागरिकांनी सुरुवात केली.

---इन्फो--

राखीव वनात बारा तास आगीचे तांडव

पंधरा ते वीस वनर्कमचारी आणि दीडशे गावकऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालत रात्रीच्या काळोखात आग विझविण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू केले. झाडांच्या तोडलेल्या ओल्या फांद्यांची ‘झाडू’ तयार करत झोडपणी करून पेटलेले गवत विझवित होते. मात्र, वारा रात्री प्रचंड सुटल्याने भडकलेली आग काही करता शमत नव्हती. शुक्रवारी (दि.५) संध्याकाळी सात वाजल्यापासून भडकलेली आग शनिवारी सकाळी सात वाजेपर्यंत विझता विझत नव्हती. या आगीवर शनिवारी सकाळी आठ वाजता पूर्णपणे नियंत्रण मिळविण्यास यश आले.

---इन्फो---

दाेघे संशयित ताब्यात; दोघे फरार

गावकऱ्यांच्या मदतीने संशयित सौरभ संदीपान पवार, चंद्रकांत भट्टू महाले या दोघा संशयित तरुणांना वन कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून ताब्यात घेतले आहे. त्यांचे दोन साथीदार मित्र मात्र अंधाराचा फायदा घेत फरार झाले. या दोघांना इगतपुरी तालुका न्यायालयात शनिवारी हजर केले असता, न्यायालयाने वनकोठडी सुनावली आहे. पवार व महाले हे त्यांच्या दोन मित्रांसह राखीव वनाजवळ मद्यपान-धूम्रपान करत होते, यावेळी त्यांनी दाखविलेल्या निष्काळजीपणामुळे आग लागल्याचे वनक्षेत्रपाल विवेक भदाणे यांनी सांगितले. हे दोघेही युवक वैद्यकीय शाखेच्या अखेरच्या वर्षाचे शिक्षण घेत आहेत.

---

फोटो आर वर ०६फायर नावाने