शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

वीज उपकेंद्र पाडले बंद

By admin | Updated: September 13, 2016 01:03 IST

विखरणी : ‘अक्षयप्रकाश’ पूर्ण न केल्याने शेतकरी संतप्त

पाटोदा : विखरणीसह परिसरातील कातरणी आडगाव रेपाळ, कानडी व अन्य गावांना सुरळीत वीजपुरवठा व्हावा. यासाठी आमदार छगन भुजबळ यांनी सुमारे दोन कोटी रुपये खर्च करून उभे केलेले सबस्टेशन अनेक त्रुटी असतानाच व लाभक्षेत्रातील गावासाठी मंजूर असलेली अक्षयप्रकाश योजना सुरू न करताच आज (दि.१२) सायंकाळी ६ वाजता वीज वितरण कंपनीचे अधिकारी मुनकर, सूर्यवंशी व आॅपरेटर कुऱ्हाडे यांनी विखरणी येथील सबस्टेशन सुरु करण्याचा प्रयत्न केला. मात्र संतप्त ग्रामस्थांनी अक्षयप्रकाश योजनेचे काम पूर्ण झाल्या खेरीज सबस्टेशन सुरु न करण्याचा पवित्रा घेत अधिकारीवर्गाला लेखी निवेदन दिले. सबस्टेशनला कुलूप ठोकले व सबस्टेशन पहिल्याच दिवशी बंद पाडले.पाटोदा गटातील विखरणी, कातरणी, विसापूर, आडगाव रेपाळ, कानडी व अन्य गावांना शेतीला तसेच उद्योग धंद्यांना सुरळीत वीजपुरवठा मिळावा यासाठी सन २०१३ मध्ये विखरणी येथे सबस्टेशन मंजूर केले. सन २०१३ च्या अखेरीस मंजूर झालेले विखरणी सबस्टेशन २०१६च्या अखेरीसला धीम्या गतीने पूर्ण झाले खरे पण तेही सबस्टेशन त्रुटी ठेऊनच वारंवार ग्रामस्थांनी तक्रारी करूनही विद्युत मंडळाच्या अधिकारी वर्गाने या कामाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले. अवघ्या ६ महिन्याचे काम तीन वर्ष सुरू राहूनदेखील ते चांगल्या रीतीने पूर्ण झालेच नाही. ग्रामीण भागातल्या प्रत्येकाच्या जिव्हाळ्याची असणारी अक्षय प्रकाश सुरु न करताच कुणालाही खबर न लागू देता वीज मंडळाचे अधिकारी श्री मुनकर, श्री सूर्यवंशी, आॅपरेटर कुऱ्हाडे हे सब स्टेशन सायंकाळी ६ वाजता सबस्टेशन सुरु करण्यासाठी विखरणीत दाखल झाले, मात्र गावात कुजबुज लागताच ग्रामस्थ मोठया संख्येने जमा झाले, ग्रामस्थांचा आवेश पाहून मात्र कर्मचारी वर्गाची तारांबळ उडाली. अक्षय प्रकाश योजने संर्दभत कोणीही अधिकारी वर्गाला समाधानकारक उत्तर देता आले नाही. अखेर ग्रामस्थानी लेखी तक्रार देऊन सबस्टेशन सुरु न करण्याचा निर्णय घेतला. श्रावण वाघमोडे, श्रीहरी खरे, अशोक कोताडे, राजेंद्र शेलार, सोपान पगार, वाल्मीक शेलार, योगेश उशीर, समाधान वाघमोडे, लक्ष्मण कदम, अरूण ठोंबरे, रवींद्र शेलार, राजेंद्र मढे, जीवन मढे, किसन बीडगर यांनी सबस्टेशनला टाळा ठोकला.(वार्ताहर)