शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

वीज कडाडताच मोबाइल बंद करा; झाडांपासून दूर रहा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:11 IST

नाशिक : पावसाळ्यात आकाशात वीज चमकत असतात, तर अनेकदा वीज जमिनीवर कोसळून मोठी दुर्घटना घडते. वीज पडल्यामुळे मनुष्यहानी ...

नाशिक : पावसाळ्यात आकाशात वीज चमकत असतात, तर अनेकदा वीज जमिनीवर कोसळून मोठी दुर्घटना घडते. वीज पडल्यामुळे मनुष्यहानी तसेच जनावरेदेखील मृत्युमुखी पडत असतात. या नैसर्गिक आपत्तीला रोखता येत नसले तरी आपण आपली काळजी घेणे अपेक्षित आहे. आकाशातील विजेबाबत अनेक गैरसमज समाजात असल्यानेदेखील काही दुर्घटना घडल्या.

पावसाळ्यात वीज अंगावर पडण्याचा धोका लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडूनदेखील आवाहन केले जाते. जिल्ह्यात अनेक ठिकाणी वीज अटकाव यंत्रेदेखील बसविण्यात आलेली आहेत. उंच इमारतींवरदेखील अशा प्रकारचे नियोजन केले जाते. शहरापेक्षा ग्रामीण भागातील शेतमळ्यात, डोंगरमाथा तसेच झाडांवर वीज पडून अपघात होण्याच्या घटना अधिक घडतात.

--इन्फो--

वीज कडाडताना घ्या अशी काळजी

आकाशात वीज चमकत असताना शक्यतो घरातील विजेची उपकरणे बंद करावीत, अशावेळी विजेवर चालणाऱ्या वस्तूंची दुरुस्ती, जोडणी अथवा वायरींशी खेळ करू नये, वीज पटकन अशा यंत्रणाकडे आकर्षित होत असल्याने त्यांचा वापरही यावेळी करू नये, अशावेळी पाण्यात उभे राहू नये, फोटो काढण्यासाठी मोबाइलचा वापर करूच नये, मोबाइलमध्ये वीज खेचली जाण्याचा धोका असतो.

--काेट--

वीज चमकत असताना झाडाखाली, विजेच्या खांबाखाली थांबू नये. कारण येथून वीज पास होऊ शकते. पतंगदेखील उडवू नये, गच्चीवर असाल तर खाली यावे, शक्यतो उंचावर, मोकळ्या मैदानात थांबणे धोक्याचे ठरते.

-अजित टक्के, मराठी विज्ञान परिषद.

--इन्फो--

जिल्ह्यातील वीज अटकाव यंत्रणा

जिल्ह्यात आकाशातील विजेमुळे दुर्घटना होऊ नये याबाबतची दक्षता घेतली जाते. पावसाळ्यात याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती केली जाते. जिल्हा प्रशासनाने याबाबतचा कृती आराखडादेखील तयार केला आहे. जिल्ह्यात २५ ठिकाणी वीज अटकाव यंत्रणा कार्यन्वित आहे. जिल्हाधिकारी तसेच विभागीय आयुक्त कार्यालयाच्या इमारतींवर ही यंत्रणा कार्यान्वित आहे. त्याप्रमाणे प्रत्येक तहसील कार्यालयातही यंत्रणा बसविण्यात आली आहे.

--इन्फो--

वीज पडल्याने घडणाऱ्या घटना नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरो अर्थात एनसीआरबीची आकडेवारी पाहिल्यास भारतात २०१७ मध्ये २८२५, २०१८ मध्ये २३५७ आणि २०१९ मध्ये २,८७६ इतक्या जणांचा वीज पडल्यामुळे मृत्यू झाला आहे. टेलिफोन किंवा विजेच्या खांबांखाली थांबू नका ते विजेला आकर्षित करतात.

विजा चमकत असताना मोबाइल फोनचा वापर करू नये.

--इन्फो--

वीज पडून मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या जवळच्या वारसाला राज्य शासनाकडून चार लाख रुपयांची नुकसानभरपाई दिली जाते. महसूल, मदत व पुनर्वसन विभागातर्फे ही माहिती दिली जाते. ‌विजेमुळे ६० टक्क्यांपेक्षा अधिक अपंगत्व आलेल्या व्यक्तीस दोन लाख रुपयांची मदत दिली जाते. वीज पडून ४० ते ६० टक्के अपंगत्व आल्यास ५९ हजार १०० तर ६० टक्केपेक्षा अधिक अपंगत्व आल्यास दोन लाखांची मदत मिळते. एका आठवड्यापेक्षा जादा काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल असल्यास १२ हजार ७०० तर एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीसाठी चार हजार ३०० रुपये इतकी मदत मिळते.