शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटकांच्या मदतीसाठी नाशिकमध्ये ‘टुरिस्ट पोलीस’

By admin | Updated: March 27, 2017 01:05 IST

नाशिक : पर्यटकांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण व मदतीसाठी पोलीस आयुक्तरवींद्रकुमार सिंगल यांनी ‘नाशिक शहर टुरिस्ट पोलीसह्ण ही संकल्पना मांडली असून, ती लवकरच कार्यान्वित होणार आहे़

नाशिक : धार्मिक पर्यटनस्थळ वा मंदिराचे शहर ही नाशिकची पुरातन व प्रमुख ओळख़ यामध्ये दिवसेंदिवस प्रगती होऊन औद्योगिक विस्तार, मुंबईच्या सुवर्ण त्रिकोणातील एक महत्त्वपूर्ण शहर, वाइन कॅपिटल अशी शहराची प्रगती झाली़, असे असले तरी शहरात येणाऱ्या देशातील वा जगभरातील पर्यटकांमध्ये बहुतांशी पर्यटक हे धार्मिक कार्यासाठीच येतात़ या पर्यटकांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण व मदतीसाठी पोलीस आयुक्तरवींद्रकुमार सिंगल यांनी ‘नाशिक शहर टुरिस्ट पोलीसह्ण ही संकल्पना मांडली असून, ती लवकरच कार्यान्वित होणार आहे़ नाशिक शहराची ओळख हे धार्मिक क्षेत्र असून, प्रभू श्रीरामचंद्र, सीता, लक्ष्मण यांनी वनवासाच्या काळात पंचवटीत वास्तव्य केल्याचे सांगितले जाते़ शहरात पंचवटीतील रामकुंड, तपोवन, सीतागुंफा, मुक्तिधाम, सोमेश्वर, नवश्या गणपती यांसह दादासाहेब फाळके स्मारक, नेहरू वनोद्यान, असे अनेक पर्यटन व धार्मिक स्थळे आहेत़ अस्थिविसर्जनासाठी तर देश तसेच जगभरातून नागरिक येतात़ याबराबरोच वाइन कॅ पिटल, यंत्रभूमी अशीही नाशिकची ओळख आहे़ नाशिक शहरात येणाऱ्या पर्यटकांना अडचणींचे निराकरण करण्यासाठी आता नाशिक पोलीस मदत करणार आहेत़पोलीस आयुक्त सिंगल यांनी ‘नाशिक शहर टुरिस्ट पोलीस’ ही संकल्पना मांडली असून, लवकरच ते कार्यान्वितही केले जाणार आहे़ नाशिक शहरातील पर्यटनस्थळी पर्यटकांना आलेल्या अडचणी या टुरिस्ट पोलिसांकडून सोडविल्या जाणार आहेत़ या पोलिसांसाठी एक स्वतंत्र वाहन असून त्यावर ‘नाशिक शहर टुरिस्ट पोलीस’ लोगो, नाशिकची ओळख असलेला प्रवास तसेच हेल्पलाइन नंबर असणार आहे़ यावाहनाच्या डिझाइनचे काम आर्टिस्ट एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे़ या वाहनामध्ये एक अधिकारी, तीन महिला पोलीस कर्मचारी व चालक असा सुमारे पाच कर्मचाऱ्यांचा ताफा एका शिफ्टमध्ये असणार आहे़ शहरात येणाऱ्या पर्यटकांना शहराची माहिती नसल्याने त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते़ यातून अनेकदा त्यांची फसवणूक होते, मात्र त्यांना वेळेत मदत मिळत नसल्याने शहराची बदनामी होते़ त्यांचा शहराकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलतो़(प्रतिनिधी)