शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

हुल्लारे वस्तीवर उत्साहात तुळशी विवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2020 00:58 IST

नायगाव : वेळ सायंकाळची...सनईचे मंगलमय स्वर...अंगणात नातेवाइकांची धावपळ....शुभमंगल सावधानचे....भटजींचे स्वर....अंगावर पडणाऱ्या फुलांच्या अक्षदा... फटाक्यांची होणारी आतषबाजी...अशा आनंदी वातावरणात जायगाव-सिन्नर रस्त्यावरील हुल्लारे वस्तीवर तुळशी विवाह पार पडला.

ठळक मुद्देफिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करून हा सोहळा पार पडला.

नायगाव : वेळ सायंकाळची...सनईचे मंगलमय स्वर...अंगणात नातेवाइकांची धावपळ....शुभमंगल सावधानचे....भटजींचे स्वर....अंगावर पडणाऱ्या फुलांच्या अक्षदा... फटाक्यांची होणारी आतषबाजी...अशा आनंदी वातावरणात जायगाव-सिन्नर रस्त्यावरील हुल्लारे वस्तीवर तुळशी विवाह पार पडला.दरवर्षी कार्तिकी एकादशीपासून सुरू होणाऱ्या तुळशी विवाहाचा समारोप त्रिपुरी पौर्णिमेला होतो. पौर्णिमेचे औचित्य साधत सिन्नर तालुक्यातील जायगाव येथील नंदु हुल्लारे यांनी मोठ्या थाटात विवाहाचे आयोजन केले होते. रविवारी सायंकाळी अंगणात आंब्याच्या डहाळ्यांनी सजलेल्या मंडपास केलेली विद्युत रोषणाईने परिसर उजळून निघाला होता. सायंकाळी ७ वाजता वधू पिता नंदू व माता सुरेखा यांनी वधू (तुलसी)ला सजवून मांडवात आणले. वर कृष्ण म्हणून उभ्या केलेल्या उसाला सजविण्यात आले होते. अर्जुन दिघोळे व श्रीकृष्ण गिते यांनी अंतरपाट धरून मांडवात उभे होते.वर-वधूच्या व-हाडी मंडळीच्या भूमिकेत समस्त जायगावकर मांडवात स्तानापन्न होते. शुभमंगल सावधान मंगलाष्टक होताच उपस्थितानी अक्षदा म्हणून फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव केला. तुळशी विवाह होताच फटाक्यांची आतषबाजी केली. यावेळी ग्रामस्थांच्या भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली होती.दरवर्षी हुल्लारे कुटुंब हे तुळशी विवाह मोठ्या थाटात साजरे करतात. या वर्षीही त्रिपुरी पौर्णिमेच्या मुहूर्तावर विवाहाचे आयोजन करण्यात आले होते. फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करून हा सोहळा पार पडला. 

टॅग्स :Diwaliदिवाळीsinnar-acसिन्नर