नाशिक : न्यायालयीन खटल्यात विरोधात साक्ष देत असल्याची कुरापत काढून ऋषिकेश राम फुले (२७, रा. टाकसाळ लेन) या साक्षीदारास सात संशयितांनी बेदम मारहाण करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी (दि़२३) पहाटे अडीच वाजेच्या सुमारास भद्रकालीतील टाकसाळ लेन परिसरात घडली़ भद्रकाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २०१० मधील एका गुन्ह्याचा न्यायालयात खटला सुरू आहे़ या खटल्यात ऋषिकेश फुले याने संशयित विशाल दीपक सौदे (२३, महालक्ष्मी चाळ, बागवानपुरा), हरिप्रसाद गौरीलाल जोशी (२२, रा़ राजलक्ष्मी अपार्टमेंट, कलानगर, इंदिरानगर), हेमंत कैलास काळे (२४, मनपा बिल्ंिडग, उपनगर कॉलनी), रोहित रामेरसिंग चव्हाण (२३, महालक्ष्मी चाळ, बागवानपुरा), संदीप रामभाऊ खरात (२४, रा़ विठ्ठल निवास, इंदिरानगर), सुनील देवीदास चोरमारे (२६, गुरूआनंद अपार्टमेंट, राणेनगर, इंदिरानगर), रोहन मोहन कंडेरा (२३, महालक्ष्मी चाळ, वाल्मीकी मंदिराजवळ, बागवानपुरा, नाशिक) यांच्याविरोधात साक्ष दिली होती़
खटल्यातील साक्षीदारास जिवे मारण्याचा प्रयत्न
By admin | Updated: July 24, 2016 23:33 IST