शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

उद्योग उभारण्यासाठी प्रयत्न करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 00:10 IST

जेव्हा अनेक तरुण माझ्याकडे नोकरीसाठी येतात तेव्हा मी त्यांना, तुम्ही सांगा त्याठिकाणी शिफारस करतो, असे सांगून यापेक्षा स्वत:चा उद्योग उभारण्यासाठी प्रयत्न करा. त्यात यशस्वी व्हा. नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणारे व्हा. आज अनेक कारखाने बंद आहेत त्यामुळे उद्योगात पडलो असे न म्हणता उद्योगात यशस्वी होणार असे म्हणून वाटचाल करा, असे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

ठळक मुद्देभुजबळ : ‘उद्योगविश्व’मध्ये उद्योजकांकडून मार्गदर्शन

नाशिक : जेव्हा अनेक तरुण माझ्याकडे नोकरीसाठी येतात तेव्हा मी त्यांना, तुम्ही सांगा त्याठिकाणी शिफारस करतो, असे सांगून यापेक्षा स्वत:चा उद्योग उभारण्यासाठी प्रयत्न करा. त्यात यशस्वी व्हा. नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणारे व्हा. आज अनेक कारखाने बंद आहेत त्यामुळे उद्योगात पडलो असे न म्हणता उद्योगात यशस्वी होणार असे म्हणून वाटचाल करा, असे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.गंगापूररोड येथे वाणी मित्रमंडळाच्या वतीने आयोजित ‘उद्योगविश्व २०२०’ या कार्यक्र मात ते बोलत होते. यावेळी ते असे म्हणाले की, आज शंभर टक्के सहकारी साखर कारखाने बंद आहेत. तर खासगी साखर कारखाने सुरू आहेत. कारण सहकारी क्षेत्रावर व सहकार क्षेत्रावर अनेक बंधने आहेत. कुठला ना कुठला कर अथवा नियमावलीच्या माध्यमातून उद्योजकांच्या वाटेत राजकारणीच अडथळे निर्माण करतात. वास्तविक उद्योजकांसाठी सरकार ‘फॅसिलिटी’च्या भूमिकेत असले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. यावेळी कार्यक्र मासाठी यशस्वी उद्योजकांकडून उपस्थिताना मार्गदर्शन करण्यात आले. महाबळेश्वर येथील सनराइस कॅन्डल्सचे भावेश भाटीया, सह्याद्री अ‍ॅग्राचे विलास शिंदे, वनलाइन वेलनेसच्या डॉ. रेखा चौधरी यांनी त्यांचे अनुभव कथन केले. याप्रसंगी संस्थापक अध्यक्ष नितीन दहिवेलकर, संजय बागड, सरचिटणीस संजय दुसे, चिटणीस राजेंद्र कोठावदे, हर्षद चिंचोरे, हितेश देव, देवदत्त जायखेडकर, महेश पितृभक्त, प्रवीण अमृतकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन अभिनेत्री समीरा गुजर यांनी केले. तर योगेश राणे यांची उद्योगविश्वच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी योगेश राणे यांची ‘उद्योगविश्व’च्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.उद्योगविश्व पुरस्कार आर्किटेक्ट रवींद्र अमृतकर, डोंबिवलीतील वैद्यकीय व्यावसायिक डॉ. मिलिंद शिरोडकर, पुण्यातील अभिनव ग्रुपचे संचालक श्यामकांत शेंडे यांना देण्यात आला. तर तरुण उद्योजक म्हणून बांधकाम व्यावसायिक अभय नेरकर यांना उद्योगरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.

 

टॅग्स :businessव्यवसाय