शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

विश्वस्तपदाचा वाद न्यायालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 00:30 IST

श्री काळाराम संस्थान विश्वस्त मंडळाच्या विश्वस्तपदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने दहा विश्वस्तांच्या जागांपैकी अध्यक्षांनी निवडलेल्या तीन जागांवर एका माजी विश्वस्ताने हरकत घेत उच्च न्यायालयात दावा दाखल केल्याने तिघा विश्वस्तांची निवड वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

ठळक मुद्देकाळाराम मंदिर : माजी विश्वस्तांनी घेतली हरकत

पंचवटी : श्री काळाराम संस्थान विश्वस्त मंडळाच्या विश्वस्तपदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने दहा विश्वस्तांच्या जागांपैकी अध्यक्षांनी निवडलेल्या तीन जागांवर एका माजी विश्वस्ताने हरकत घेत उच्च न्यायालयात दावा दाखल केल्याने तिघा विश्वस्तांची निवड वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.काळाराम विश्वस्त मंडळ सहा वर्षांसाठी असते. त्यात विश्वस्त मंडळाच्या एकूण दहा जागा असून, त्यात घटनेनुसार जिल्हा व सत्र न्यायाधीश हे संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. विश्वस्तांच्या दहा जागांपैकी तीन जागा या पुजारी घराण्यातील, तर तीन विश्वस्त जुन्या विश्वस्तातून निवडण्याचे अधिकार अध्यक्षांना आहेत व उर्वरित चार जागा धर्मादाय आयुक्तांकडून निवडल्या जातात. अध्यक्षांनी जुन्या विश्वस्त मंडळातील मंदार जानोरकर, वैद्य एकनाथ कुलकर्णी, दत्तप्रसाद निकम यांची अलीकडेच नियुक्ती केली आहे.२०१९ ते २५ या सहा वर्षांच्या कालावधीसाठी व घटनेत नमूद असलेल्या जुन्या सदस्यातून ३ सदस्य निवडताना १४ आॅक्टोबर २०१९ रोजी बैठकीचा अजेंडा काढला आहे. त्यात बैठकीचे ठिकाण जिल्हा न्यायालयातील त्यांच्या स्वत:च्या निजी कक्षात दर्शविले आहे. मुळात संस्थेची बैठक अशा न्यायालय आवारात निजी कक्षात घेता येत नाही.दरम्यान, धमार्दाय आयुक्तांकडून नियुक्त केल्या जाणाºया चार जागांसाठी तब्बल ७२ इच्छुकांनी अर्ज केले होते. त्यातून सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्त शांताराम अवसरे, अ‍ॅड. दिलीप कैचे, शुभम मंत्री आणि डॉ. मिलिंद तारे या चौघांची निवड करण्यात आली. तर पुजारी घराण्यातून धनंजय पुजारी, मंगेश पुजारी, नरेश पुजारी यांची निवड करण्यात आली आहे.संस्थेच्या पैशाचा गैरवापरदत्तप्रसाद निकम हे संस्थेचे संचालक असताना त्यांनी संस्थेच्या कार्यक्रमात पत्नीच्या नावे गायनापोटी ११ हजार रुपये मानधन मिळवून दिले आहे. संस्थेच्या संचालकांनी स्वत:च्या किंवा कुटुंबातील कोणतीही व्यक्तीसाठी संस्थेच्या पैशांचा वापर करणे हे मुंबई सार्वजनिक विश्वस्त कायद्याने गुन्हा असल्याची हरकत माजी विश्वस्त पांडुरंग बोडके यांनी घेत न्यायालयात दावा दाखल केला आहे.धर्मादाय आयुक्तांनी चौघा विश्वस्तांची निवड केली, मात्र त्यांचा काळाराम मंदिराशी काही एक संबंध नाही. अनेक जण वर्षानुवर्षे देवाची सेवा करतात त्यांना संधी दिली गेली पाहिजे होती. स्थानिकांना डावलून कोणत्या निकषावर विश्वस्त नियुक्त केले हे स्पष्ट होणे गरजेचे आहे.- रावसाहेब कोशिरे, अध्यक्ष,रास्ते आखाडा तालीम संघ

टॅग्स :Religious Placesधार्मिक स्थळे