शहरं
Join us  
Trending Stories
1
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
2
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
3
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
4
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
5
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
6
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
7
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
8
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
9
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
10
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
11
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
12
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
13
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
14
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
15
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
16
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
17
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
18
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
19
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
20
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष

दुसऱ्याचे भले करण्यातच खरा धर्म

By admin | Updated: October 1, 2016 23:25 IST

मोहनलाल सराफ : श्री अग्रसेनजी महाराजांच्या मूर्तीचे अनावरण

मालेगाव : दुसऱ्याचे भले करण्यासारखा इतर कोणताही धर्म नसल्याचे प्रतिपादन पांजरापोळ गोसेवा संस्थेचे उपाध्यक्ष मोहनलाल सराफ यांनी केले. येथील श्री अग्रसेन नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित या संस्थेचे कॅम्प रस्त्यावरील पारस एम्पायरमध्ये स्थलांतर झाले, त्याप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.प्रमुख पाहुणे म्हणून तालुका उपनिबंधक संगमेश्वर बदनाळे, मालेगाव कॅम्प अग्रवाल पंचायत ट्रस्टचे अध्यक्ष कैलास अग्रवाल आणि श्री आॅल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष शशीकुमार कर्नावट व अग्र सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष किरण अग्रवाल उपस्थित होेते. यावेळी किरण अग्रवाल यांच्या हस्ते अग्रसेन नागरी सहकारी पतसंस्थेच्या नूतन वास्तूत श्री अग्रसेनजी महाराज मूर्तीचे अनावरण करण्यात आले. प्रारंभी श्री अग्रसेन महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी उपस्थितांतून काढण्यात आलेल्या लकी ड्रॉमध्ये पाच विजेत्यांना बक्षिसांचे वाटप करण्यात आले. उरीतील शहीद जवानांसह दिवंगतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रास्ताविक व अहवालवाचन पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष मधुसुदन अग्रवाल यांनी केले.यावेळी किरण अग्रवाल म्हणाले, महाराष्ट्रातील पतसंस्थांनी आदर्श घ्यावा, असे येथील अग्रसेन नागरी पतसंस्थेचे काम आहे. सर्व पदाधिकारी व सदस्यांच्या सहयोगामुळेच संस्था आज या स्थानावर पोहोचल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी तालुका उपनिबंधक संगमेश्वर बदनाळे, शशी कर्नावट, बद्रीलाल अग्रवाल, पतसंस्थेचे व्यवस्थापक अरुण अग्रवाल, मामकोचे ट्रस्टी भिका कोतकर यांचीही भाषणे झाली. सूत्रसंचालन जितेंद्र बोरा यांनी तर अरुण अग्रवाल यांनी आभार मानले. कार्यक्रमास कैलास अग्रवाल, राकेश डिडवानिया, महेश पाटोदिया, दीपेश अग्रवाल, मधुसुदन काबरा, श्रीनिवास अग्रवाल, श्याम अग्रवाल, मीनादेवी अग्रवाल, नीता अग्रवाल, भटूलाल अग्रवाल, संतोष अग्रवाल, सुनीता निकम, सुशीला अग्रवाल यांच्यासह पतसंस्थेचे संचालक, कर्मचारी व समाजबांधव उपस्थित होते. (प्रतिनिधी)