सिन्नर : शिर्डी रस्त्यावर वावी गावाजवळील वळणावर सिन्नरच्या दिशेने येणारा मालवाहू ट्रक उलटल्याने चालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सिन्नर-शिर्डी रस्त्यावर सद्गुरू पेट्रोलपंपासमोर बुधवारी रात्री हा अपघात झाला. कापसाच्या गाठी घेऊन टीएन ५२ ए-१०१५ हा मालवाहू ट्रक नाशिककडे चालला होता. यावेळी चालकाला वळणाचा अंदाज न आल्याने ट्रक पलटी होऊन रस्त्याच्या कडेला पडला. या अपघातात चालकाचा (नाव समजू शकले नाही) जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी वावी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून, उपअधीक्षक रामेश्वर वेंजणे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार एस. पी. माळी पुढील तपास करीत आहेत. (वार्ताहर)
सिन्नर-शिर्डी रस्त्यावर ट्रक उलटून चालक ठार
By admin | Updated: December 25, 2015 00:45 IST