शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

ट्रक उलटून नाशिकचा वारकरी ठार

By admin | Updated: July 9, 2016 00:33 IST

ट्रक उलटून नाशिकचा वारकरी ठार

नाशिक : पंढरपूरहून विठ्ठलाचे दर्शन घेऊन परतणाऱ्या वारकऱ्यांचा ट्रक सोलापूर जिल्ह्णाच्या करमाळा तालुक्यातील जेऊरजवळ गुरुवारी (दि़ ७) मध्यरात्री उलटला़ यामध्ये नाशिकचे वारकरी मोतीराम शिंदे (आभाळाची वाडी) यांचा जागीच मृत्यू झाला असून, सुमारे ४५ वारकरी जखमी झाले आहेत़ नाशिकजवळील गंगापूर गावच्या दिंडीतील हे सर्व वारकरी असून, यातील किसन शिंदे (गंगापूर) यांची प्रकृती गंभीर आहे़ दरम्यान, जखमींवर सोलापूर जिल्ह्णातील कोरेगाव तसेच अहमदनगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ (पान ७ वर)नाशिकजवळील गंगापूर गावातून दरवर्षी पंढरपूरसाठी दिंडी जाते़ गंगापूर गावातील ११ नंबरच्या या दिंडीत सुमारे ४५ वारकरी सामील झाले होते़ करमाळ्याजवळून विठ्ठलाच्या दर्शनासाठी हे सर्वजण ट्रकमध्ये गेले होते़ पंढरपूरहून परतत असताना मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास ट्रक उलटला़ यामध्ये मोतीराम शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला, तर किसन शिंदे हे गंभीर जखमी झाले आहे़ ट्रकमधील वारकऱ्यांपैकी सुमारे १८ वारकऱ्यांच्या हाता-पायाला फ्रॅक्चर झाले असून, उर्वरित किरकोळ जखमी झाले आहेत़ या जखमी वारकऱ्यांपैकी २५ वारकऱ्यांवर सोलापूर जिल्ह्णातील कोरेगाव येथे, तर १५ वारकऱ्यांवर अहमदनगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले़ अहदमनगर रुग्णालयातील जखमींना नाशिकला हलविण्यात आले असून, कोरेगाव येथील जखमींनाही लवकरच नाशिकला हलविण्यात येणार आहे़ दरम्यान, या अपघातात मृत्युमुखी पडलेले मोतीराम शिंदे यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून नाशिकला पाठविण्यात आले आहे़(प्रतिनिधी)