शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

ट्रक २५ फूट खड्ड्यात कोसळला

By admin | Updated: May 15, 2015 23:51 IST

हरसूलचे तीन ठार : आठंबेनजीकची घटना; पाच गंभीर

 कळवण : नांदुरी रस्त्यावरील आठंबे गावानजीक घाटातील वळणावर बालभारती नाशिक येथून शालेय पुस्तके घेऊन कळवणकडे निघालेल्या आयशर ट्रकचालकाचा ताबा सुटल्याने ट्रक २५ फूट खड्ड्यात कोसळून उलटल्याने तीन जणांचा मृत्यू, तर पाच गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले आहे. नाशिक येथून बालभारतीमधून शुक्रवारी सकाळी ११ वाजता कळवण येथील पंचायत समितीत पाठ्यपुस्तके घेऊन येणारा आयशर ट्रक (क्र. एमएच १५ सीके-५९४०) आठंबेपासून एक किमी अंतरावरील घाटातील शेवटच्या धोकादायक वळणावरून चालकाचा ताबा सुटल्याने २५ फूट वळणावरील खड्ड्यात जाऊन उलटला.  ह्या ट्रक मध्ये असलेले आठ जण ट्रक व पुस्तके यांच्याखाली दाबले गेले. घटनास्थळी धाव घेऊन रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनातील लोकांच्या मदतीने ट्रक सरळ करून दाबल्या गेलेल्या व्यक्तींना बाहेर काढले मात्र ह्या घटनाक्र मात रोहिदास चिमणा हिलीम (२० ), धाकलु सीताराम पानगे (२०) रा. सर्व गोलदरी हरसुल, जि. नाशिक हे दोघे जागीच ठार झाले तर नाशिक येथे औषधोपचार दरम्यान संतोष यशवंत कामडी (२०) यांचा मृत्यु झाला. राजाराम शंकर कामडी (१७ ), तुषार सुरेश कामडी (२० ), भागिरथ गोपाळ गहवाळ (१७ ), गोकुळ विष्णू धोंडगे (२५ ) मनोहर गंगाराम कामडी (१८) सर्व रा. गोलदरी ता. हरसूल हे जखमी झाले. पुढील तपास कळवणचे पोलीस निरीक्षक मधुकर गावित यांच्या मार्गदर्शनाखाली कळवण पोलीस करीत आहे