मालेगाव : मुंबई-आग्रा महामार्गावर सौंदाणे शिवारात भरधाव वेगातील ट्रकने नाशिककडे जाणाऱ्या कारला धडक दिल्याने कारचालक ठार झाला, तर दोन जण जखमी झाले. ट्रकचालकाविरोधात तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. सोमवारी रात्री ९ च्या सुमारास ही घटना घडली. संजय प्रल्हाद राजपूत (४६), रा. राणेनगर, नाशिक या जखमीने फिर्याद दिली. ट्रक (क्र. जीजे ३, एटी २००) वरील चालकाने संजय राजपूत यांच्या शेवरलेट गाडीला (क्र. एमएच १५ बी ४३७३) धडक दिली. यात वाहनचालक कल्पेश कैलास सोनवणे-पाटील (३०), रा. वडगाव, ता. पारोळा हा ठार झाला, तर राजपूत यांची पत्नी व मुलगी गंभीर जखमी झाली. ट्रकचालक अपघाताची खबर न देता पळून गेला म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास उपनिरीक्षक गवळी करीत आहेत.
ट्रकची कारला धडक; चालक ठार
By admin | Updated: August 19, 2016 00:18 IST