शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

संगमनेर महाविद्यालयाला करंडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 00:31 IST

दोडी बुद्रुक येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात दादा पाटील केदार स्मृती करंडक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात पार पडली. स्पर्धेत मुंबई विद्यापीठाच्या किरण कीर्तीकर हिने प्रथम पारितोषिक मिळवले. तर स्मृती करंडकावर संगमनेर महाविद्यालयाने नाव कोरले.

ठळक मुद्देनिकाल जाहीर : दोडी येथे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात

सिन्नर : तालुक्यातील दोडी बुद्रुक येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात दादा पाटील केदार स्मृती करंडक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात पार पडली. स्पर्धेत मुंबई विद्यापीठाच्या किरण कीर्तीकर हिने प्रथम पारितोषिक मिळवले. तर स्मृती करंडकावर संगमनेर महाविद्यालयाने नाव कोरले.माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग केदार अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर पंचायत समिती सभापती शोभा बर्के, जिल्हा परिषद सदस्य नीलेश केदार, रामनाथ पावसे, संस्थेचे उपाध्यक्ष कारभारी आव्हाड, राजाराम आव्हाड, कारभारी शिंदे, रफिक मणियार, शिक्षणाधिकारी पांडुरंग विंचू, वि. बी. खेडकर, अशोक गिते आदी उपस्थित होते. वक्तृत्व स्पर्धेत पाच हजारांचे प्रथम पारितोषिक मुंबईच्या किरण कीर्तीकर हिने मिळवले. करंडकावर संगमनेर महाविद्यालयाने मोहर उठविली. द्वितीय पारितोषिक (तीन हजार रु पये) स्मृती बोरसे- एचपीटी महाविद्यालय नाशिक व अमोल मसलखांब यांनी संयुक्तरीत्या पटकाविले. तृतीय पारितोषिक (दोन हजार रुपये) आदित्य माने (गरवारे कॉलेज पुणे) यास मिळाले. उत्तेजनार्थ वैभव महाजन व नीलेश वडीतल्ले (अमृतवाहिनी कॉलेज, संगमनेर) यांनी मिळविले. प्राचार्य संदीप भाबड यांनी स्पर्धेविषयी माहिती दिली. एन. बी. वाकचौरे यांनी प्रास्ताविक तर के. के. घुगे यांनी सूत्रसंचालन केले.पी. एस. उगले यांनी आभार मानले. ग्रामीण भागात राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करणारे दोडी महाविद्यालय पहिले असून, विद्यार्थ्यांच्या वक्तृत्वाला चालना देण्याच्या उपक्रम गौरवास्पद असल्याचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी सांगितले.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रcultureसांस्कृतिक