शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

जवानांनी पाच मिनिटांत गाठले झाकीर हुसेन रुग्णालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:13 IST

नाशिक : मनपाच्या डॉक्टर झाकीर हुसेन रुग्णालयात मागील महिन्यात घडलेल्या ऑक्सिजन गळतीच्या घटनेने २४ रुग्णांचा बळी घेतला. या ...

नाशिक : मनपाच्या डॉक्टर झाकीर हुसेन रुग्णालयात मागील महिन्यात घडलेल्या ऑक्सिजन गळतीच्या घटनेने २४ रुग्णांचा बळी घेतला. या दुर्घटनेने संपूर्ण देश हळहळला. यावेळी सर्वप्रथम मदतीची हाक अग्निशमन दलाच्या कानी आली. मुख्यालयाचा दूरध्वनी खणखणला अन जवानांनी सज्ज होत अवघ्या ५ मिनिटांत रुग्णालय गाठले.

झाकीर हुसेन रुग्णालयाबाहेर असलेल्या ऑक्सिजन टाकीतून मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याने सर्वत्र पांढरा धूर आणि अति थंडावा पसरलेला होता. नागरिकदेखील भीतीपोटी लांब पळत होते आणि टाकीभोवती ऑक्सिजनचा भरणा करण्यासाठी आलेला टँकर उभा होता. सर्वप्रथम आपत्कालीन मदत देण्यासाठी पोहोचलेल्या जवानांना डोळ्यासमोर यावेळी केवळ धूर दिसत होता. दृश्यमानता संपूर्णपणे नष्ट झाली होती. याप्रसंगी घटनास्थळी पोहोचलेले अग्निशमन विभागप्रमुख संजय बैरागी, फायरमन उदय शिर्के, ज्ञानेश्वर दराडे, तौसिफ शेख, सोमनाथ थोरात, शरद डेटके यांनी प्रारंभी कमी व्यासाच्या पाईपच्या मदतीने धुरावर पाण्याची फवारणी करण्यास सुरुवात केली. मात्र, काही केल्या धूर कमी होत नव्हता. त्यामुळे समोर काहीच दिसत नव्हते.

--

----इन्फो----

जीवघेण्या धुरात धाडसाने शिरकाव

ऑक्सिजन टाकीच्याभोवती पसरलेल्या अतिथंड वातावरणात बैरागी आणि शिर्के यांनी ''बी.ए.'' सेट लावून या अति थंड अशा पांढऱ्या धुरात धाडसाने प्रवेश केला. ऑक्सिजन टाकीच्या व्हॉल्वभोवती लावलेले ''सेफ्टी किट'' तोडून टाकीचा व्हॉल्व बंद करण्याचे पाहिले लक्ष्य जवानांपुढे होते. त्यानुसार बैरागी यांनी शिर्के यांच्या मदतीने प्लास्टिकचे आवरण तोडून सेफ्टी किट खुली करत सुमारे अर्ध्या तासाच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर टाकीचा व्हॉल्व बंद केला आणि होणारी गळती थांबली.

-------

कोट

२७ वर्षांच्या सेवेत पहिल्यांदाच अशा प्रकारच्या दुर्घटनेला सामोरे जावे लागले. अतिथंड वातावरण, पांढरा धूर यामुळे समोर काहीच दिसत नव्हते. आम्ही सगळेच आमच्यापरीने प्रयत्न करत होतो. बी. ए. सेटच्या मदतीने आमचे अधिकारी धुरातही गेले. पाण्याच्या फवारणीमुळे ऑक्सिजनचे रूपांतर पाण्यात होण्यास मदत झाली. ही दुर्घटना काळजाचा थरकाप उडवणारी होती.

- ज्ञानेश्वर दराडे, फायरमन

----

मोठ्या संयमाने बैरागी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही दुर्घटनेची परिस्थिती हाताळत होतो. पाण्याचा मारा करूनही फारसा फरक पडत नव्हता. दृश्यमानता कमीच होती आणि ऑक्सिजन गळती थांबविणे हे आमचे टार्गेट होते. त्यामुळे बैरागी साहेबांनी बी. ए. सेट लावून टाकीच्या दिशेने जाण्याचे आदेश दिले. काही मिनिटांत मी आणि त्यांनी बी. ए. सेट परिधान करून आता प्रवेश केला. सर्वप्रथम आम्ही टाकीचा व्हॉल्व शोधून काढला. यावेळी त्यावर सुरक्षिततेच्या कारणास्तव सेफ्टी किट लावण्यात आलेली होती. हे किट आम्ही तोडण्याचा प्रयत्न करत होतो आणि त्यात अखेर यश आले.

- उदय शिर्के, फायरमन

-

फायरमन फोटो nsk वर पाठविले आहे.