शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

सक्षम लोकांना राष्टÑवादीचे तिकीट : पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 00:48 IST

नाशिक : सध्याचे राजकारण बेरजेचे असून, राष्टÑवादी कॉँग्रेस आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या निष्ठावंतांना निश्चित न्याय देईल; परंतु निवडून येण्याची क्षमता ठेवणाऱ्या अन्य पक्षांच्या लोकांनाही प्रसंगी पक्षाकडून उमेदवारी देण्यात येणार असल्याची माहिती राष्टÑवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.

ठळक मुद्देकॉँग्रेसशी बोलणी सुरूपक्षाच्या निष्ठावंतांना निश्चित न्याय देईल;

नाशिक : सध्याचे राजकारण बेरजेचे असून, राष्टÑवादी कॉँग्रेस आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या निष्ठावंतांना निश्चित न्याय देईल; परंतु निवडून येण्याची क्षमता ठेवणाऱ्या अन्य पक्षांच्या लोकांनाही प्रसंगी पक्षाकडून उमेदवारी देण्यात येणार असल्याची माहिती राष्टÑवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.विधान परिषदेचे उमेदवार शिवाजी सहाणे यांच्या पक्षप्रवेश सोहळ्यानंतर पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यातील आगामी निवडणुका कॉँग्रेसला सोबत घेऊन लढविण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी, पोटनिवडणुका होत असलेल्या बीड व लातूर या दोन्ही मतदारसंघांच्या जागा पूर्वी राष्टÑवादी कॉँग्रेसच्या होत्या व काही अपरिहार्य परिस्थितीत त्या कॉँग्रेसला सोडण्यात आल्या होत्या. आता कॉँग्रेस सदरच्या जागा लढविण्यास फारशी उत्सुक नसल्यामुळे त्या जागा राष्टÑवादीला परत मिळाव्या अशी मागणी करण्यात आली आहे व विधान परिषदेची निवडणूक दोन्ही कॉँग्रेसने एकत्र लढवावी यासाठी बोलणी सुरू असून, अद्यापतरी कॉँग्रेसने राष्टÑवादीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. विधान परिषदेच्या नाशिकच्या जागेवर गेल्या निवडणुकीत शिवाजी सहाणे यांनी राष्टÑवादीचे जयंत जाधव यांच्या विरोधात निवडणूक लढविली होती, परंतु यंदा त्यांनी राष्टÑवादीकडून निवडणूक लढविण्यासाठी पक्षाकडे विनंती केली व स्थानिक नेत्यांनीही सहाणे यांना उमेदवारी देण्यास सहमती दर्शविल्याने ते पक्षाचे उमेदवार असून, त्यांना मित्रपक्षांनीही पाठिंबा दिल्यामुळे येत्या निवडणुकीत त्यांचा विजय निश्चित असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून ३१ मेपर्यंत प्रत्येक गावातील प्रत्येक बूथनिहाय कार्यकर्त्यांची नेमणूक करण्याच्या सूचना शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्षांना देण्यात आल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.