शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

त्रिपूर वातींनी उजळणार ‘त्रिपुरारी’

By admin | Updated: November 6, 2014 00:21 IST

दीपोत्सव : गोदाघाटावर दीपदानासाठी थाटली दुकाने

नाशिक : सज्जनांचे रक्षण करत दुष्टांचे निर्दालन करा, हा सामाजिक संदेश देणाऱ्या ‘त्रिपुरारी’ पौर्णिमेनिमित्त गुरुवारी (दि. ६) शहरातील गोदाघाटासह मंदिरांचा कोपरान्कोपरा त्रिपुरी वातींनी प्रकाशमान होणार असून, विविध धार्मिक विधींचेही आयोजन करण्यात आले आहे. त्रिपुरारी पौर्णिमेबाबत लोककथा सांगितली जाते. त्रिपूर नावाच्या असुराची आकाशसंचारासह तीन पुरे अर्थात नगरे होती. ब्रह्मदेवाने या असुराला देवता, मनुष्य, निशाचर किंवा रोग यांच्यापासून मरण नसल्याचा वर दिला होता. परंतु या असुराने नंतर आपला उन्मत्तपणा दाखविण्यास सुरुवात केली. तेव्हा सर्व देवांनी भगवान शंकराला साकडे घातले. शंकराने त्रिपूर असुराची तिन्ही पुरे जाळून टाकली आणि त्याचा नायनाट केला. तो दिवस कार्तिकी पौर्णिमेचा होता. त्यामुळे या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा म्हणूनही ओळखले जाते. त्रिपूर असुराचा संहार झाल्याबद्दल ही पौर्णिमा दीप पेटवून साजरी केली जाते. त्रिपुरारी पौर्णिमेला कार्तिकेय स्वामींचे दर्शन घेतले जाते. गंगास्नान केले जाते आणि ब्रह्मवृंदाना दीपदान करण्याची प्रथा आहे. मत्स्यावतारही याच दिवशी झाल्याची आख्यायिका सांगितली जात असल्याने त्याचाही आनंद साजरा केला जातो. कार्तिकी पौर्णिमेला प्रदोष काळी त्रिपुरासुराला ठार मारले असल्याने त्याचा आनंदोत्सव म्हणून दिवाळीप्रमाणेच मंदिरे, नदीकिनारी दीप प्रज्वलित केले जातात. शिवमंदिरांसमोर त्रिपूर वातींनी परिसर प्रकाशमान केला जातो. दीपमाळ दिव्यांनी सजविली जाते. याचबरोबर नदीच्या पात्रातही प्रज्वलित केलेले दीप सोडण्याची प्रथा आहे. तसेच ‘त्रिपूरज्वलन’ हे व्रत केले जाते. शिवापुढे वाती लावणे, वाती जाळणे, दीपपात्री दान करणे असा विधी शास्त्रात सांगितला आहे. उत्तर भारतात त्रिपुरारी पौर्णिमा स्कंद जयंती म्हणून साजरी केली जाते, तर दक्षिण भारतात त्रिपुरारी पौर्णिमेला कृतिका महोत्सव साजरा होतो. कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षात नरकासुर, त्रिपुरासुर आणि अन्य असुरांचा देवादिकांनी वध केल्याने दीपावलीपासून दीपप्रज्वलन करण्याची परंपरा सुरू झाली. त्रिपुरारी पौर्णिमेला दीपावलीची सांगता होत असते. समाजातील दुष्ट प्रवृत्ती जाळून टाका, असा सामाजिक संदेश त्रिपुरी वातींनी जाळून दिला जातो. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त गोदाघाट दिव्यांनी उजळणार असून, सायंकाळी नदीपात्रात दीप सोडण्यासाठीही महिलावर्गाची मोठी गर्दी उसळणार आहे. सोमेश्वरजवळील बालाजी मंदिरही त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त सहस्त्र दिव्यांनी उजळून निघणार आहे. (प्रतिनिधी)