शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
5
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
6
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
7
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
8
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
10
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
11
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
12
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
13
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
14
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
15
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
16
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
17
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
18
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
19
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

मजूर संघाची निघाली सहल

By admin | Updated: August 8, 2015 23:15 IST

सोमवारी निवडणूक : २१ पैकी १६ संचालकांची उपस्थिती

नाशिक : जिल्हा मजूर सहकारी संघाच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक सोमवारी (दि.१०) होत असून, या निवडणुकीच्या व्यूहरचनेसाठी शनिवारी (दि.८) मजूर संघाचे संचालक सहलीला गेले. अध्यक्षपदासाठी तिघांमध्ये स्पर्धा असली तरी ऐनवेळी नाव बदलण्याची शक्यता आहे.मावळते अध्यक्ष राजाराम खेमनार व उपाध्यक्ष म्हसू कापसे यांनी राजीनामे दिल्यानंतर ते सहकार प्राधिकरणाने मंजूर केले असून, त्यानुसार येत्या १० आॅगस्ट रोजी जिल्हा सहकारी मजूर संघाच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक जाहीर केली आहे. या निवडणुकीसाठी तालुका उपनिबंधक गोपाळ मावळे यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या आठवडाभरात अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या संचालकांनी जिल्हा परिषद सभापती केदा अहेर यांच्यासह माजी जिल्हा बॅँक संचालक राजेंद्र भोसले, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष संपतराव सकाळे, मराठा विद्या प्रसारक संस्थेचे संचालक रवींद्र देवरे यांच्या भेटी-गाठी घेऊन ‘फिल्डिंग’ लावल्याची चर्चा होती. त्यातच बुधवारी (दि.५) सहलीला जाण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र निवडणूक सोमवारी असल्याने आणि अन्य नेत्यांचे वेळापत्रक व्यस्त असल्याने बुधवार ऐवजी शनिवारी (दि.८) सहलीला जाण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार शनिवारी सकाळी ९ वाजेपर्यंत जिल्हा मजूर संघाच्या कार्यालयात जवळपास २१ पैकी १६ संचालक जमले काही संचालक रस्त्यात असल्याने व उशिरा जाणार असल्याने या १६ संचालकांनी चार खासगी वाहनांमधून अलिबागकडे प्रयाण केल्याची चर्चा आहे. सहलीला जाणाऱ्या संचालकांमध्ये माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष संपतराव सकाळे, शिवाजी रौंदळ, गणपतराव चौधरी, दिलीप पाटील, प्रमोद मुळाणे, गोरख शिंदे, म्हसू कापसे, संजय चव्हाण यांच्यासह अन्य संचालकांचा समावेश होता. जिल्हा परिषद सभापती केदा अहेर व जिल्हा बॅँकेचे माजी संचालक राजेंद्र भोसले हे उशिरा सहलीला जाणार आहेत. सोमवारी(१०) दुपारपर्यंत ही संचालक मंडळी नाशिकला पोहोचणार आहे. सायंकाळी पाच वाजेपासून निवडीच्या प्रक्रियेस सुरुवात होणार आहे. (प्रतिनिधी)